Man drives tractor on cricket pitch video Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Man drives tractor on cricket pitch video: महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एका तरुणाने थेट ट्रॅक्टर घेऊन मैदानात प्रवेश केला आणि अवघ्या काही मिनिटांत खेळपट्टी (पिच) उखडून टाकली. विशेष म्हणजे, या सामन्याचे यूट्यूबवर थेट प्रक्षेपण सुरू असताना हा सर्व प्रकार घडल्याने क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

नेमका प्रकार काय? जळगाव ग्रामीण 'आमदार चषक' (MLA Cup) या टेनिस क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत उत्साहात सुरू होता. प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत असताना अचानक एका तरुणाने ट्रॅक्टर वेगाने मैदानात आणला. त्याने थेट स्टम्प्सवर ट्रॅक्टर चढवला आणि खेळपट्टीवर ट्रॅक्टर गोल फिरवून पिच पूर्णपणे उद्ध्वस्त केली. ट्रॅक्टरच्या चाकांमुळे मैदानावर मोठे खड्डे पडले आणि खेळपट्टी खेळण्यायोग्य राहिली नाही. हा प्रकार पाहून खेळाडू आणि प्रेक्षक पूर्णपणे अवाक झाले होते.

राजकीय वादातून राडा? मिळालेल्या माहितीनुसार, या कृत्यामागे राजकीय वैमनस्य असल्याचे बोलले जात आहे. जळगाव जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला या स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. या गोष्टीचा राग मनात धरून त्या व्यक्तीच्या समर्थकाने हे टोकाचे पाऊल उचलले आणि रागाच्या भरात संपूर्ण खेळपट्टीच उद्ध्वस्त केली. या धक्कादायक प्रकारामुळे आयोजकांना अखेर अंतिम सामना रद्द करावा लागला.

व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल थेट प्रक्षेपणामध्ये हा राडा कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. खेळाच्या मैदानात राजकारण आणून खेळाडूंचे नुकसान केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आणि क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. अद्याप याप्रकरणी अधिकृत पोलीस तक्रार दाखल झाली नसली तरी, या घटनेने जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT