Litton Das Dainik Gomantak
क्रीडा

BAN vs IRE: लिटन दासने केला जबरदस्त रेकॉर्ड, गोलंदाजांना भरली धडकी!

Bangladesh vs Ireland 2nd T20 : आयपीएल 2023 (IPL-2023) चा 16वा सीझन सुरु होण्यापूर्वीच एका खेळाडूने मैदानात आपला जलवा दाखवला आहे.

Manish Jadhav

Bangladesh vs Ireland 2nd T20 : आयपीएल 2023 (IPL-2023) चा 16वा सीझन सुरु होण्यापूर्वीच एका खेळाडूने मैदानात आपला जलवा दाखवला आहे.

31 मार्चपासून सुरु होणाऱ्या या लीगमध्ये हा खेळाडू कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) खेळताना दिसणार आहे.

या धडाकेबाज फलंदाजाच्या जोरावर बांगलादेशने मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यातही आयर्लंडचा पराभव केला.

बांगलादेशने टी-20 मालिका जिंकली

बांगलादेशने (Bangladesh) दुसऱ्या T20 सामन्यात आयर्लंडचा 77 धावांनी पराभव केला. या विजयाच्या जोरावर बुधवारी चितगाव येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात बांगलादेशने 3 सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली.

पावसामुळे 17 षटकांच्या या सामन्यात सलामीवीर लिटन दासने चमकदार कामगिरी केली. त्याने 41 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 83 धावांची खेळी खेळली. कर्णधार शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) 22 धावांत 5 बळी घेतले.

केवळ 18 चेंडूत अर्धशतक ठोकले

लिटन दासनेही मोठा विक्रम केला. त्याने अवघ्या 18 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले, जे बांगलादेशी फलंदाजाचे सर्वात जलद T20 आंतरराष्ट्रीय अर्धशतक आहे. त्याने मोहम्मद अश्रफुलला मागे सोडले, ज्याने 2007 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 विश्वचषकात 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

शाकिबही चमकला

लिटनच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशने 3 बाद 202 धावा केल्या. त्याने रोनी तालुकदार (44) सोबत पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली.

कर्णधार शाकीबनेही नाबाद 38 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना शाकीबच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर आयर्लंडचा संघ नऊ विकेट्सवर केवळ 125 धावाच करु शकला.

संघाने केवळ 43 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्टिस कॅम्फरने 30 चेंडूंत तीन षटकार आणि तब्बल 50 धावा करत सर्वाधिक धावा केल्या. शाकिबने 5 तर तस्किन अहमदने 27 धावांत 3 बळी घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुनेत्रा पवारांनी घेतली पद अन् गोपनीयतेची शपथ, महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला 'उपमुख्यमंत्री'; PM मोदींकडून शुभेच्छा VIDEO

Operation Herof2: बलुचिस्तानमध्ये क्वेटासह 10 शहरांवर बलोच बंडखोरांचा ताबा, पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून पळाले; 10 ठार VIDEO

Pakistan Economy Crisis: "मुनीर अन् मी पैसे मागतो तेव्हा..." शहबाज शरीफ यांनी मांडली आर्थिक गुलामगिरीची व्यथा; परकीय कर्जाच्या अटींपुढे झुकला पाकड्यांचा कणा

Congo Landslide: 'कांगो'मध्ये निसर्गाचा महाप्रलय! मुसळधार पावसानं डोंगराचा कडा कोसळून 200 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये मुलांचाही समावेश VIDEO

Goa Elections 2027: प्लॅनिंग तयार, आता मैदानात उतरा! भाजप अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला 2027 च्या विजयाचा 'महामंत्र'; विधासभा निवडणुकीचं फुंकलं रणशिंग

SCROLL FOR NEXT