Lionel Messi Dainik Gomantak
क्रीडा

Lionel Messi Video: मेस्सीचा इंटर मियामीसाठी पदार्पणातच जलवा! फ्री किकवर केला विजयी गोल

Lionel Messi Video: लिओनल मेस्सीने 21 जुलैला इंटर मियामीकडून पदार्पणाचा सामना खेळतानाच शानदार कामगिरी केली.

Pranali Kodre

Lionel Messi Scores Goal on Free Kick for Inter Miami Debut Match: अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीने पॅरिस सेंट जर्मेन संघातून बाहेर पडल्यानंतर इंटर मियामी क्लबशी करार केला होता. त्यामुळे आता मेस्सी अमेरिकेच्या या इंटर मियामी संघाकडून खेळताना दिसत आहे.

दरम्यान मेस्सीने इंटर मियामीकडून पदार्पणाच्या सामन्यातच शानदार कामगिरी केली. त्याने 21 जुलैला पदार्पण करताना संघाला मॅक्सिकन क्लब क्रुज अलुजविरुद्ध विजय देखील मिळवून दिला.

लीग कपमध्ये इंटर मियामीने क्रुज अझुलविरुद्धच्या सामन्यात 2-1 असा विजय मिळवला. या सामन्यात इंटर मियामीकडून रॉबर्ट टेलरने 44 व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवला होता. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये क्रुझ अझुलकडून युरिएल अंतुनाने 65 व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली.

त्यामुळे सामन्याच्या निर्धारित 90 मिनिटानंतर 1-1 अशी बरोबरी झालेली होती. पण भरपाई वेळेत मेस्सीने फ्री किकवर गोल नोंदवत इंटर मियामीला आघाडी मिळवून दिली आणि त्याच्यासाठी पदार्पणाचा सामनाही अविस्मरणीय बनवला.

मेस्सीचा हा गोल इंटर मियामीसाठी महत्त्वाचा ठरला. कारण या गोलमुळे संघालाही विजय मिळवता आला. त्याने हा गोल केल्यानंतर संघासह मैदानात सामना पाहाण्यासाठी आलेल्या चाहत्यांनीही जोरदार जल्लोष केला.

सातवेळच्या बॅलन डी'ओर पुरस्कार विजेत्या मेस्सीचा हा गोल पाहून संघाचा सह संघमालक डेव्हिड बॅकहमही भावूक झाला होता. इंटर मियामीचे प्रशिक्षक टाटा मार्टिनो सामन्यानंतर म्हणाले, 'हे एका चित्रपटासारखे आहे, जे आपण यापूर्वीही पाहिला आहे.'

800 पेक्षाही अधिक गोल केलेल्या मेस्सीसाठी इंटर मियामीने 1000 मिलियन डॉलरपेक्षाही अधिक रकमेचा करार केला आहे.

पीएसजीबरोबचा मार्ग झाला वेगळा...

लिओनल मेस्सी गेली दोन वर्षे पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) संघाकडून खेळत होता. पण त्याचा काही दिवसांपूर्वीच या संघाबरोबरचा मार्ग मोकळा झाला आणि तो इंटर मियामी संघात सामील झाला होता.

अनेक रिपोर्टनुसार मेस्सीने इंटर मियामी संघात सामील होण्यापूर्वी सौदी अरेबियातील अल हिलाल क्लबने दिलेली महागड्या कराराची ऑफर नाकारली होती.

दरम्यान मेस्सी पहिल्यांदाच युरोपबाहेरील क्लबकडून फुटबॉल खेळताना आता दिसत आहे. त्याने यापूर्वी बार्सिलोना आणि पीएसजी या युरोपमधील क्लबकडून फुटबॉल खेळले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT