lionel messi Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2026: वयाच्या 38व्या वर्षीही मेस्सीचाच रुबाब! ऐतिहासिक हॅट्ट्रिकसह रोनाल्डो अन् पेलेचे सर्वात मोठे रेकॉर्ड्स ध्वस्त; गतविजेत्या अर्जेंटिनाचा अल्जीरियावर शानदार विजय

Lionel Messi Historic Hattrick FIFA World Cup 2026: वयाच्या 38व्या वर्षीही मैदानावरील जादू तशीच कायम राखत अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा जागतिक फुटबॉल विश्वाला थक्क केले.

Manish Jadhav

Lionel Messi Historic Hattrick FIFA World Cup 2026: वयाच्या 38व्या वर्षीही मैदानावरील जादू तशीच कायम राखत अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा जागतिक फुटबॉल विश्वाला थक्क केले. जेव्हा अनेकांना वाटत होते की मेस्सीच्या कारकिर्दीचा हा शेवटचा टप्पा आहे, नेमक्या त्याचवेळी त्याने फिफा वर्ल्ड कप 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात असा ऐतिहासिक खेळ केला जो फुटबॉल चाहते वर्षानुवर्षे लक्षात ठेवतील.

गतविजेत्या अर्जेंटिनाने लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) नेत्रदीपक हॅट्ट्रिकच्या जोरावर अल्जीरियाचा 3-0 असा धुव्वा उडवून आपल्या विश्वचषक मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली. कॅन्सस सिटी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मेस्सीने पूर्णपणे छाप सोडली. त्याने तीन उत्कृष्ट गोल करुन केवळ अर्जेंटिनाला विजयच मिळवून दिला नाही, तर जागतिक फुटबॉलमधील अनेक बड्या दिग्गजांचे विक्रम मोडीत काढले.

मेस्सीच्या जागतिक विश्वचषक कारकिर्दीतील ही पहिलीच हॅट्ट्रिक ठरली. यासोबतच फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासात 6 वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळणारा तो जगातील पहिला फुटबॉलपटू बनला. मेस्सीने या हॅट्ट्रिकच्या जोरावर विश्वचषकातील आपल्या एकूण गोलची संख्या 16 वर पोहोचवली. या कामगिरीसह त्याने जर्मनीचा महान स्ट्रायकर मिरोस्लाव क्लोझे याच्या विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली.

आता विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत मेस्सी आणि क्लोझे संयुक्तपणे अव्वल स्थानी आले. त्यांच्यापाठोपाठ रोनाल्डो 15 गोलांसह दुसऱ्या तर गर्ड मुलर आणि किलियन एम्बापे 14 गोलांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहेत.

याशिवाय, विश्वचषकाच्या एकाच सामन्यात एकापेक्षा जास्त गोल करणारा मेस्सी हा जगातील सर्वात वयस्कर खेळाडू बनला असून, त्याने कॅमेरुनच्या रॉजर मिला यांचा जुना विक्रम मोडीत काढला. वयाच्या 38 वर्षे आणि 357 दिवसांमध्ये हॅट्ट्रिक नोंदवून त्याने त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विक्रमही मोडला; रोनाल्डोने वयाच्या 33व्या वर्षी हॅट्ट्रिक केली होती. इतकेच नव्हे तर, अर्जेंटिनाच्या या कर्णधाराने ब्राझीलचे महान दिवंगत खेळाडू पेले यांचा विश्वचषकातील सर्वाधिक गोल योगदानाचा (गोल आणि असिस्ट) विक्रमही मोडला.

सामन्यापूर्वी मेस्सी आणि पेले दोघांचेही 21-21 गोल योगदान होते, परंतु या सामन्यातील तीन गोल्सनंतर मेस्सीचा हा आकडा 24 वर पोहोचला. आता मेस्सीच्या नावावर विश्वचषकात 16 गोल आणि 8 असिस्ट नोंदवले गेले असून, त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की फुटबॉलच्या दुनियेत तोच खरा राजा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT