Lionel Messi Dainik Gomantak
क्रीडा

Lionel Messi Video: 'चला, मुलांनो झोपायची वेळ झाली...', FIFA Award स्विकारताच मेस्सीचा लेकांना स्पेशल मेसेज

Video: फिफाचा 2022 मधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार स्विकारल्यानंतर मेस्सीने त्याच्या तिन्ही मुलांना खास संदेश दिला होता.

Pranali Kodre

Lionel Messi: अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनल मेस्सीची गणना दिग्गज खेळाडूंमध्ये होते. आजपर्यंत त्याने अनेक विक्रम मोडलेही आहेत आणि रचलेही आहेत. नुकताच त्याला 2022 वर्षातील फिफाचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला.

सोमवारी पॅरिसमध्ये फिफाचा द बेस्ट 2022 पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात मेस्सीला सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटूचा पुरस्कार देण्यात आला. त्याने त्याचा पॅरिस सेंट जर्मेन क्लब संघातील संघसहकारी कायलिन एमबाप्पे आणि रियल मद्रिदचा करिम बेंझेमा यांना मागे टाकत हा पुरस्कार मिळवला.

मेस्सी गेल्यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान झालेल्या फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतीलही सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. त्याने अर्जेंटिनाचे नेतृत्व करताना हा वर्ल्डकप जिंकवून दिला होता.

दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यासाठी मेस्सीसह त्याची पत्नी अँटोनेला रोकुजो देखील उपस्थित होती. पण त्यांची तिन्ही मुळे थियागो, मतेओ आणि सिरो हे घरी होते. त्यामुळे पुरस्कार स्विकारल्यानंतर मेस्सीने त्याच्या तिन्ही मुलांना एक असा संदेश दिला, तो ऐकून सर्वांनाच हसू आले.

तो पुरस्कार स्विकारल्यानंतर म्हणाला, 'वर्ल्डकप विजय हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात सुंदर घटना आहे. वर्ल्डकप विजयाचे स्वप्न अनेक जण पाहातात, पण खूप कमी जणांचे ते पूर्ण होते. मी माझ्या कुटुंबाचे, अर्जेंटिनातील लोकांचे आभार मानू इच्छितो, कारण आता ही अविस्मरणीय घटना ठरली आहे. मी माझ्या मुलांना खूप प्रेम पाठवतो, जे हा कार्यक्रम पाहात असतील. थियागो, मतेओ आणि सिरो, आय लव्ह यू. पण आता झोपायला जा.'

मेस्सीने त्याच्या मुलांना झोपण्यास सांगितल्याचे ऐकून सर्वांनाच हसू आले. मेस्सी पुरस्कार स्विकारल्यानंतर असेही म्हणाला, 'हा पुरस्कार जिंकणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. मी माझ्या संघसहकाऱ्यांचे, माझे मॅनेजर स्कलोनी यांचे आभार मानतो. मी त्या सर्वांचे इथे प्रतिनिधित्व करत आहे, त्यांच्याशिवाय मी इथे येऊ शकलो नसतो. जे साध्य झाले आहे, त्यामध्ये त्यांनी बजावलेली भूमिका मी ओळखतो.'

'माझ्यासाठी हे एक अप्रतिम वर्ष ठरले. एवढ्या संघर्षानंतर आणि वर्ल्डकप जिंकण्यासाठी जिद्द ठेवून मी माझे स्वप्न पूर्ण केले आहे.'

(Lionel Messi Good Night Message to His Children During FIFA Awards)

मेस्सीने कतारमध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत 7 गोल नोंदवले होते. तसेच 3 असिस्ट केले होते. तो फिफा वर्ल्डकपमध्ये दोन वेळा सर्वोत्तम खेळाडू ठरलेला पहिलाच खेळाडू देखील आहे. त्याने यापूर्वी 2014 वर्ल्डकपमध्येही गोल्डन बॉल जिंकला होता.

तसेच फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये आणखी एक विक्रम केला होता. तो एकाच वर्ल्डकपमध्ये साखळी फेरी, उपउपांत्यपूर्व फेरी, उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात गोल करणारा पहिलाच खेळाडू ठरला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT