Lavinio Rebello Senior vice president of Goa football has passed away
Lavinio Rebello Senior vice president of Goa football has passed away 
क्रीडा

गोवा फुटबॉलचे ज्येष्ठ उपाध्यक्ष लव्हिनियो रिबेलो यांचे निधन

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी: गोवा(Goa) फुटबॉल असोसिएशनचे (GFA) ज्येष्ठ उपाध्यक्ष, राज्यातील फुटबॉलमधील(Football) दीर्घानुभवी फुटबॉल प्रशासक लव्हिनियो रिबेलो(Lavinio Rebello) यांचे शनिवारी रात्री उशिरा कोविड-19(Covid-19) संसर्गामुळे इस्पितळात निधन झाले.(Lavinio, senior vice president of Goa football has passed away)

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवरील फुटबॉल स्पर्धा आयोजनात नेहमीच अग्रेसर राहणारे लव्हिनियो सुमारे दोन दशके राज्यातील फुटबॉल प्रशासनात सातत्याने सक्रिय होते. मृत्यूसमयी ते 54 वर्षांचे होते. ते बार्देश तालुक्यातील हणजुण येथील रहिवासी होते.

जीएफएच्या सध्याच्या व्यवस्थापकीय समितीत ते उत्तर विभागाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्या अकाली निधनाबद्दल गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आमदार चर्चिल आलेमाव यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. फुटबॉलप्रती समर्पित असलेला सच्चा मित्र गमावला आहे, अशी प्रतिक्रिया आलेमाव यांनी दिली. कोविड-19 मुळे वर्षभरात मृत्यूमुखी पडलेले लव्हिनियो हे जीएफएचे दुसरे पदाधिकारी होते.

या प्रसंगी दिल्लीच्या फुटबॉलअसोशिएशनचे अध्यक्ष शाजी प्रभाकरण यांनी शोक व्यक्त केला आहे. "मी त्यांच्या परिवाराबद्दल, त्यांच्या प्रिय व्यक्तींबद्दल मनापासून शोक व्यक्त करतो, गोवा फुटबॉलमध्ये (GFA) मध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे . मी त्यांना वैयक्तिकरित्या गेल्या 16 वर्षापासून ओळखतो. त्यांच्या जाण्याने फुटबॉल संघाचे चे मोठे नुकसान झाले त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली असे ट्विट त्यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa's News Wrap: ताळगाव निवडणूक निकाल, फोंड्यात खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT