Team India Dainik Gomantak
क्रीडा

ICC Test Rankings: आनंद काही क्षणाचाच! टीम इंडियाने गमावला नंबर वनचा किताब

Team India: रोहित ब्रिगेडने कसोटी संघाच्या क्रमवारीत पुन्हा पहिले स्थान पटकावल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांना बुधवारी आनंद झाला.

Manish Jadhav

ICC Test Rankings: रोहित ब्रिगेडने कसोटी संघाच्या क्रमवारीत पुन्हा पहिले स्थान पटकावल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांना बुधवारी आनंद झाला. रोहित हा पहिला कर्णधार ठरला, ज्याच्या नेतृत्वाखाली संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनला.

मात्र, दुपारी पहिल्या क्रमांकावर पोहोचलेल्या संघाचा मुकुट सायंकाळपर्यंत गमवावा लागल्याने चाहत्यांच्या आनंदावर काही तासातच विरजण पडले.

वास्तविक, आयसीसीच्या (ICCI) वेबसाइटवरील चुकीमुळे हे घडले, हा तांत्रिक बिघाड होता. 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता झालेल्या चाचणीत भारत पहिल्या स्थानावर होता, परंतु संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या स्थानावर घसरला. ऑस्ट्रेलियाचे आता 126 रेटिंग गुण आहेत, तर भारताचे 115 रेटिंग गुण आहेत.

दरम्यान, आयसीसीच्या वेबसाइटवर आधी रँकिंग अपडेट करण्यात आली, तेव्हा भारताचे (India) 115 रेटिंग पॉइंट होते. ऑस्ट्रेलिया 111 रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरला. मात्र, क्रमवारीत सुधारणा झाल्यानंतर केवळ भारतच नाही तर इतर संघांच्या मानांकन गुण आणि स्थानांमध्येही बदल झाले आहेत.

याआधी चौथ्या क्रमांकावर असलेला न्यूझीलंड पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तान सातव्या स्थानावरुन सहाव्या स्थानावर गेला आहे. बांगलादेश आणि झिम्बाब्वेचे संघ अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर कायम आहेत.

विशेष म्हणजे, आयसीसीच्या वेबसाइटवर कसोटी क्रमवारीत असा बदल गेल्या महिन्यातही पाहायला मिळाला होता. त्यावेळीही भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन अव्वल क्रमांकाचा मुकुट पटकावला होता.

तांत्रिक बिघाड आयसीसीने काही तासांतच दुरुस्त केला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे.

भारताने सिरीजवर 1-0 अशी आघाडी कायम ठेवली आहे. नागपुरात भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. शुक्रवारपासून दिल्लीत दुसरी कसोटी सुरु होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

SCROLL FOR NEXT