Lalit Modi Sanjiv Goenka Dainik Gomantak
क्रीडा

"मी अध्यक्ष असतो तर गोयंकांवर कायमची बंदी घातली असती!" ललित मोदींची 'गुगली' अन् संजीव गोयंकांची दांडी गुल Watch Video

Lalit Modi Sanjiv Goenka Controversy IPL 2026: लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका आणि कर्णधार ऋषभ पंत यांच्यातील एका संवादावरुन सुरु झालेल्या वादात आता आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी उडी घेतली.

Manish Jadhav

Lalit Modi Sanjiv Goenka Controversy IPL 2026: आयपीएल 2026 च्या हंगामाला सुरुवात होताच मैदानाबाहेरील वादाने क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडवून दिली. लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका आणि कर्णधार ऋषभ पंत यांच्यातील एका संवादावरुन सुरु झालेल्या वादात आता आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी उडी घेतली.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (Delhi Capitals) पहिल्याच सामन्यात 6 गड्यांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर गोयंका मैदानावर पंत आणि सपोर्ट स्टाफशी चर्चा करताना दिसले. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी याची तुलना 2024 मध्ये केएल राहुलसोबत झालेल्या गैरवर्तणुकीशी केली, ज्यामुळे वादाला तोंड फुटले.

या प्रकरणावर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने 'एक्स'वर मत व्यक्त करताना म्हटले की, स्पर्धेचा केवळ पहिलाच सामना झाला असताना अशा वर्तणुकीची अजिबात गरज नव्हती. वॉनच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना ललित मोदी यांनी संजीव गोयंका यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. मोदी म्हणाले की, "जर मी आज आयपीएलचा (IPL) अध्यक्ष असतो, तर संजीव गोयंका यांच्यावर त्वरित बंदी घातली असती आणि त्यांच्याकडून संघाची मालकी कायमची काढून घेतली असती." त्यांनी गोयंका यांचा उल्लेख 'लूजर' आणि 'जोकर' असा करत, त्यांच्या वर्तणुकीचा आपल्याला अभिमान वाटण्याऐवजी लाज वाटत असल्याचे स्पष्ट केले.

ललित मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे नमूद केले की, आयपीएलची निर्मिती ही चाहते आणि खेळाडूंसाठी करण्यात आली होती, दरवर्षी अशा प्रकारच्या कृत्यांसाठी नाही. त्यांच्या मते, फ्रँचायझी करारात अशा वर्तणुकीसाठी एक विशेष कलम असून बीसीसीआयने त्याची कडक अंमलबजावणी करायला हवी. "सत्ताधारी लोकांची चापलूसी करणे हा अशा कृत्यांतून वाचण्याचा मार्ग असू शकत नाही, बीसीसीआयने प्रामाणिकपणाला सर्वोच्च स्थान द्यावे," असे आवाहनही त्यांनी केले. मोदींच्या या आक्रमक पवित्र्यामुळे क्रिकेट वर्तुळात संजीव गोयंका यांच्या प्रतिमेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

दुसरीकडे, हा वाद अवास्तव वाढत असल्याचे पाहून लखनऊ सुपर जायंट्सच्या व्यवस्थापनाने स्वतःहून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. फ्रँचायझीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये संजीव गोयंका, ऋषभ पंत आणि सपोर्ट स्टाफ एकमेकांशी हसून खेळून संवाद साधताना दिसत आहेत. "तुम्ही जे पाहता ती नेहमीच पूर्ण सत्य नसते, हा पराभवानंतरचा खरा आणि अनफिल्टर्ड माहोल आहे," असे कॅप्शन देऊन त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, ललित मोदींच्या टीकेमुळे आणि चाहत्यांच्या संतापामुळे या प्रकरणाची चर्चा अद्याप थांबलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळवारचा दिवस ठरणार भाग्यवर्धक! अनेक राशींना करिअरमध्ये यश, व्यवसायात नफा आणि धनलाभाचे प्रबळ योग

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT