Kumar Sangakkara remembers Shane Warne Dainik Gomantak
क्रीडा

IPL: शेन वॉर्नची आठवण काढत कुमार संगकारा म्हणाला...

अनेक स्टार खेळाडूंनी भरलेल्या राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) पहिल्या सामन्यात सात खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली.

दैनिक गोमन्तक

राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या 15 व्या मोसमाची शानदार विजयाने सुरुवात केली. माजी चॅम्पियन्सने संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा पहिला सामना 61 धावांनी जिंकला. सॅमसनचे अर्धशतक आणि हेटमायर-पडिक्कलच्या झंझावाती खेळीच्या जोरावर राजस्थानने प्रथम 210 धावा केल्या. यानंतर चहल, बोल्ट आणि फेमस यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर संघाने सनरायझर्सला 149 धावांत रोखले. (Kumar Sangakkara remembers Shane Warne)

अनेक स्टार खेळाडूंनी भरलेल्या राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) पहिल्या सामन्यात सात खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रणभव कृष्णा, रविचंद्रन अश्विन आणि नॅथन कुल्टर-नाईल प्रथमच फ्रेंचायझीसाठी खेळले.

रॉयल्सने त्यांच्या सोशल मीडिया (Social Media) हँडलवर सामन्यापूर्वीचा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये टीम डायरेक्टर कुमार संगकारा ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नच्या (Shane Warne) आठवणी सांगताना दिसला. यावेळेस त्याने खेळाडूंना भावनिक संदेश देखील दिला.

संगकाराने पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना वॉर्नची आठवण करून देत अभिमानाने फ्रेंचायझीची कॅप घालण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला, “तुम्ही सगळे वॉर्नसारखे वेगळे आहात. त्यामुळे आज जेव्हा तुम्ही ही टोपी घालाल तेव्हा ती वॉर्नसाठी, स्वतःसाठी आणि फ्रेंचायझीसाठी घाला." ऑस्ट्रेलियन दिग्गज आणि महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT