Kuldeep Yadav - Ravindra Jadeja | India vs England | Test Cricket AFP
क्रीडा

IND vs ENG: जडेजा तिसरी कसोटी खेळणार की नाही? कुलदीप म्हणाला, 'त्याने एका सेशनमध्ये...'

Ravindra Jadeja availability in 3rd Test : जेडजाची इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटींसाठी भारतीय संघात निवड झाली असली, तरी त्याची उपलब्धता तंदुरुस्तीवर अवलंबून आहे. याबाबत कुलदीपनेही प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Kuldeep Yadav opened up on Ravindra Jadeja Availability in India vs England 3rd Test at Rajkot:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे खेळवला जाणार आहे. दरम्यान, या सामन्याआधी भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने रविंद्र जडेजाच्या उपलब्धतेबाबतही प्रतिक्रिया दिली.

इंग्लंड हैदराबादमध्ये पहिला कसोटी सामना खेळताना जडेजाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे तो विशाखापट्टणमला झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकला होता. पण त्यानंतर आता त्याची निवड उर्वरित तिन्ही सामन्यांसाठी भारतीय संघात झाली आहे.

मात्र, त्याची उपलब्धता ही त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल, असे बीसीसीआयने सांगितले होते. त्याच्या तंदुरुस्तीवर सध्या बीसीसीआयची मेडिकल टीम लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, जडेजा तिसरा कसोटी सामना खेळण्याची दाट शक्यता आहे, याबाबत कुलदीप यादवनेही संकेत दिले आहेत.

कुलदीपने सांगितले की 'तो त्याचे रुटीन पूर्ण करत आहे. त्याने काल एका सत्रात सरावही केला आहे. मला वाटते तो उपलब्ध असेल.'

तथापि, जर जडेजा तिसरा सामना खेळणार असेल, तर मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याच्यासाठी कुलदीप यादव किंवा अक्षर पटेलला जागा रिकामी करावी लागेल. किंवा जडेजासह कुलदीप आणि अक्षर देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकतात.

मात्र, अद्याप याबद्दल निर्णय होणे बाकी असल्याचे कुलदीपने सांगितले. तो म्हणाला, 'मला माझ्या जागेबद्दल खात्री नाबी,. कारण अद्याप सामन्यासाठी दोन दिवस बाकी आहेत.'

कुलदीप म्हणाला, 'जर मला संधी मिळाली, तर मला आनंदच होईल. पण मी खेळेल की नाही, याबद्दल फार विचार करत नाहीये. मी फक्त माझ्या दिवसांचा आनंद घेत आहे आणि मेहनत करत आहे. ही माझी पद्धत आहे. सांघिक खेळाडू संमिश्रण महत्त्वाचे असते, हे समजणं अगदी साधं आहे.'

केएल राहुल बाहेर

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध उर्वरित तीन सामन्यांसाठी केएल राहुलचीही भारतीय संघात निवड झाली होती. मात्र अद्याप तो पूर्ण तंदुरुस्त नसल्याने तो तिसऱ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागेवर तिसऱ्या सामन्यासाठी देवदत्त पडिक्कलची बदली खेळाडू म्हणून निवड झाली आहे.

  • तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा (तंदुरुस्तीवर अवलंबून), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, देवदत्त पडिक्कल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

SCROLL FOR NEXT