Asia Cup 2023, India vs Sri Lanka, Kuldeep Yadav Record:
आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर फोर फेरीत मंगळवारी भारताने श्रीलंकेला 41 धावांनी पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. भारताच्या या विजयात चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने महत्त्वाचा वाटा उचलला. कोलंबोमध्ये पार पडलेल्या या सामन्यादरम्यान कुलदीने मोठा विक्रमही रचला आहे.
या सामन्यात कुलदीप यादवने 9.3 षटके गोलंदाजी करताना 43 धावांत 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने वनडेत 150 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला. त्याने त्याच्या 88 व्या वनडे सामन्यात खेळताना हा विक्रम केला आहे.
त्यामुळे तो भारताचा सर्वात जलद 150 विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. त्याने अजित अगरकरचा विक्रम मागे टाकला आहे. अगरकरने 97 सामन्यांत 150 वनडे विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. तसेच या यादीत अव्वल क्रमांकावर मोहम्मद शमी आहे. शमीने 80 सामन्यात 150 वनडे विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच सर्वात जलद 150 वनडे विकेट्स घेणाऱ्या जगातील एकूण फिरकीपटूंमध्ये कुलदीप चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने इम्रान ताहिरला मागे टाकले आहे. ताहिरने 89 वनडे सामन्यांमध्ये 150 विकेट्स घेतल्या होत्या.
80 - मोहम्मद शमी
88 - कुलदीप यादव
97 - अजित अगरकर
103 - झहिर खान
106 - अनिल कुंबळे
106 - इरफान पठाण
78 - सक्लेन मुश्ताक
80 - राशिद खान
84 - अजंता मेंडिस
88 - कुलदीप यादव
89 - इम्रान ताहिर
दरम्यान, मंगळवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव 49.1 षटकात 213 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने ५३ धावांची खेळी केली. तसेच इशानने 33 धावांची खेळी केली, तर केएल राहुलने 39 धावांची खेळी केली.
श्रीलंकेकडून दुनिथ वेलालागेने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच चरिथ असलंकाने 4 विकेट्स घेतल्या आणि महिश तिक्षणाने 1 विकेट घेतली.
त्यानंतर 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 41.3 षटकात 172 धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेकडून दुनिथ वेलालागेने सर्वाधिक 42 धावांची नाबाद खेळी केली. तसेत धनंजय डी सिल्वाने 41 धावांची खेळी केली. पण बाकी कोणाला फार काही करता आले नाही.
भारताकडून कुलदीप व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराद आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.