Pranali Kodre
क्रिकेटमध्ये चायनामन गोलंदाज असा शब्द अनेकांनी ऐकला असेल. भारताचा कुलदीप यादव हा चायनामन गोलंदाज आहे.
कुलदीप हा भारताकडून खेळणारा पहिला चायनामन गोलंदाजही आहे. पण ही गोलंदाजी शैली म्हणजे नक्की काय, हे जाणून घेऊ.
मनगटाचा वापर करून डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला चायनमन म्हणून ओळखले जाते.
चायनामन गोलंदाज हे क्रिकेटमध्ये दुर्मिळ आहेत.
चायनामन गोलंदाजांनी टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध आत येते, तर डाव्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध बाहेर जातो.
अनेक रिपोर्टनुसार असे म्हटले जाते की चीनी वंशाचे एलिस पस एचोंग हे वेस्ट इंडिजकडून डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करायचे. त्यांनी १९३३ मध्ये ओल्ड ट्रॅफर्डला झालेल्या कसोटीत इंग्लंडच्या वॉल्टर रॉबिन्सला बाद केले होते.
त्यावेळी रॉबिन्सन यांनी चिडून पॅव्हेलियनमध्ये परत जाताने एचोंगसाठी चायनामन शब्दाचा प्रयोग केला होता. तेव्हा पासून मनगटाचा वापर करून डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला चायनामन म्हटले जाते.
गारफिल्ड सोबर्स, पॉल ऍडम्स, ब्रॅड हॉग्स, लक्षण सांदरन असे काही चायनामन गोलंदाजांचे उदाहरणे आहेत.