Kuldeep Sen IPL
क्रीडा

वेगवान गोलंदाज कूलदिप RCB वर पडला भारी, राजस्थान रॉयल्सचा एकहाती विजय

राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज कुलदीप सेनने आपल्या वेगवान गोलंदाजीची छाप पाडून आरसीबीविरुद्धच्या सामन्यात 4 खेळाडूंना बाद केले.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 च्या 39 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आरसीबी (RCB) संघाचा 29 धावांनी पराभव केला. या सामन्यात राजस्थानच्या गोलंदाजांनी अप्रतिम खेळ दाखवला. राजस्थानसाठी 15 वर्षीय गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. या खेळाडूमुळेच राजस्थानला सामना जिंकता आला. या सामन्यातील सर्वात वेगवान चेंडूही कुलदीप सेनने (Kuldeep Sen) टाकला. सामन्यानंतर त्याने सांगितले की, मला ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करायची आहे. (IPL 2022 Updates)

या खेळाडूने केली अप्रतिम कामगिरी

आरसीबी संघाविरुद्ध, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने ओबेद मॅककॉयच्या जागी कुलदीप सेनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला. या सामन्यात कुलदीप सेनने अत्यंत किलर गोलंदाजी केली. त्याने टाकलेला ओव्हर खेळणे कोणालाही सोपे नव्हते. त्याने 3.3 षटकात 20 धावा देत 4 बळी घेतले. तो राजस्थान रॉयल्ससाठी सर्वात मोठा सामना विजेता म्हणून उदयास आला आहे.

सातवे षटक जोरदार गाजवले

राजस्थान रॉयल्ससाठी कुलदीप सेनने डावातील सातवे षटक केले. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कुलदीप सेनने आरसीबीच्या फाफ डू प्लेसिसला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर कुलदीपने ग्लेन मॅक्सवेलला बाद केले. मॅक्सवेलला खातेही उघडता आले नाही. कुलदीप सेनला हॅटट्रिक घेता आली नाही, पण त्याच्या आक्रमक गोलंदाजीने त्याने सामन्याचा रंग नक्कीच बदलला.

देशांतर्गत स्पर्धेत ताकद दाखवली

आरसीबी विरुद्ध कुलदीप सेनचा हा फक्त तिसरा सामना होता. कुलदीप सेनने देशांतर्गत स्पर्धेत शानदार खेळ दाखवला. कुलदीप संथ गतीच्या चेंडूंवर झटपट विकेट घेतो. जो डेथ ओव्हर्समध्ये तो खूप किफायतशीर ठरतो. कर्णधार संजू सॅमसनला जेव्हा जेव्हा विकेट लागते तेव्हा तो कुलदीप सेनला मैदानावर उतरवतो.

हे चार फलंदाज पडले फिके

प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करणारा कुलदीप सेन बेंगळुरूविरुद्ध बॉलिंग करताना रंगात दिसला. या युवा वेगवान गोलंदाजाने फाफ डू प्लेसिस (23), ग्लेन मॅक्सवेल (0) आणि वानिंदू हसरंगा (18) यांचे बळी घेतले. त्याने सलग दोन चेंडूंवर फॅफ आणि मॅक्सवेलला बाद केले. कुलदीपने आरसीबीच्या फलंदाजीचा कणा मोडला. कुलदीपमुळेच राजस्थान रॉयल्स संघाला सामना जिंकता आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT