पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोचे जगभरात चाहते आहेत. पाच वेळा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकणाऱ्या रोनाल्डोचे भारतातही लाखो चाहते आहेत. गोव्याची राजधानी पणजीतही याचे चाहते पाहायला मिळाले आहेत. इंग्लंडच्या मँचेस्टर युनायटेड क्लबकडून रोनाल्डोचा पुतळा पणजीत बसवण्यात आला आहे. या मूर्तीचे वजन 410 किलो आहे.
या पुतळ्यावरून वाद निर्माण होत असून पुतळा बसवलेल्या ठिकाणी आंदोलन (Movement) उगरण्यात आले आहे. आंदोलकांनी राज्य सरकारवर (State Government) दिग्गज स्थानिक फुटबॉलपटूंकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार अर्जून पुरस्कार (Awards) विजेते ब्रुनो कोटिन्हो हे मुळचे कलंगुटचेच आहेत. मात्र त्यांचा सन्मान करण्याऐवजी पोर्तुगालच्या रोनाल्डोचा पुतळा बसवण्यात आला असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, तरुणांना प्रेरणा मिळावी आणि फुटबॉलला (Football) राज्यात आणि देशात पुढच्या स्तरावर नेण्यासाठी रोनाल्डोचा पुतळा बसवण्यात आला आहे. युवा पिढीला खेळासाठी प्रेरित करून त्यांची स्वप्ने पूर्ण करणे हा या स्थापनेमागचा उद्देश आहे.
गोव्याचे (goa) मंत्री मायकल लोबो यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, "भारतात क्रिस्टियानो रोनाल्डोचा पुतळा बसवण्याची ही पहिलीच वेळ आहे. ती आपल्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तरुण मुल-मुली यातून प्रेरणा घेतील."
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.