ISL Football Dainik Gomantak
क्रीडा

ISL Football: केरळा ब्लास्टर्सवरील विजयात पेत्रातोसची हॅटट्रिक

केरळा ब्लास्टर्सने घरच्या मैदानावर सामना गमावला

दैनिक गोमन्तक

कोची: ऑस्ट्रेलियन आघाडीपटू दिमित्री पेत्रातोस याच्या शानदार हॅटट्रिकच्या बळावर एटीके मोहन बागानने रविवारी गोलधडाका राखला. त्यामुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सला घरच्या मैदानावर मोठ्या संख्येने आलेल्या पाठीराख्यांसमोर पराभवास सामोरे जावे लागले. कोलकात्याच्या संघाने एका गोलच्या पिछाडीवरून सामना 5-2 फरकाने जिंकला.

(Kolkata won the Indian Super League football tournament match)

आयएसएल स्पर्धेत पहिलाच मोसम खेळणाऱ्या पेत्रातोस याने यंदाच्या स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक नोंदविली. त्याने अनुक्रमे 26 वे, 62 व्या आणि 90+2 व्या मिनिटास चेंडूला गोलनेटची दिशा दाखविली. याशिवाय फिनलंडचा विश्वकरंडक खेळाडू जॉनी कौको याने 38 व्या, तर बदली खेळाडू लेनी रॉड्रिग्ज याने 88 व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल नोंदवत हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील संघाच्या मोठ्या विजयात वाटा उचलला.

युक्रेनचा इव्हान कलियूझ्नी याने सहाव्याच मिनिटास केरळा ब्लास्टर्सला आघाडी मिळवून दिली होती. इव्हानने आता दोन सामन्यांतून तीन गोल केले आहेत. केरळा ब्लास्टर्सचा अन्य एक गोल 81 व्या मिनिटास बदली खेळाडू के. पी. प्रवीण याने नोंदविला.

स्पर्धेतील अगोदरच्या लढतीत चेन्नईयीन एफसीकडून पराभव पत्करलेल्या एटीके मोहन बागानने या विजयासह गुणतक्त्यात तीन गुण मिळविले. केरळा ब्लास्टर्सने स्पर्धेतील पहिल्याच लढतीत ईस्ट बंगालला पराजित केले होते, पण रविवारी पराभूत झाल्यामुळे त्यांचे तीन गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

SCROLL FOR NEXT