KKR  X/KKRiders
क्रीडा

IPL 2024 साठी कोलकाता नाईट रायडर्स संघात मोठा बदल, इंग्लिश गोलंदाजाच्या बदली खेळाडूची घोषणा

Kolkata Knight Riders: आयपीएलच्या 17 व्या हंगामापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघाने संघात एक बदल केला आहे.

Pranali Kodre

Kolkata Knight Riders named Dushmantha Chameera as replacement for Gus Atkinson for IPL 2024:

इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगाम मार्चच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व संघांची या आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी तयारी सुरू झाली आहे. अशातच कोलकाता नाईट रायडर्सने इंग्लंडचा गोलंदाज गस ऍटकिन्सनच्या बदली खेळाडूची घोषणा केली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुश्मंता चमिरा याला ऍटकिन्सनच्या जागेवर संघात सामील करुन घेतले आहे. दरम्यान ऍटकिन्सनने आयपीएलमधून माघार का घेतली आहे, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

त्यामुळे सध्या मार्क वूडप्रमाणेच त्याचेही कारण असू शकते अशी शक्यता आहे. मार्क वूडचा आगामी आयसीसी स्पर्धा लक्षात घेता वर्कलोड सांभाळण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याचे नाव आयपीएलमधून मागे घेतल्याचे वृत्त इंग्लिश मीडियाने दिले होते.

दरम्यान, आयपीएलने दिलेल्या माहितीनुसार चमिराला 50 लाखांच्या किंमतीत कोलकाताने संघात सामील करून घेतले आहे. आपल्या वेगासाठी ओळखला जाणाऱ्या चमिराला यापूर्वी आयपीएल खेळण्याचा अनुभव आहे.

चमिरा 2018 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता, तर 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा भाग होता. मात्र त्याला या दोन्ही संघांकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. नंतर त्याने 2022 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचे प्रतिनिधित्व केले. या हंगामात त्याने 12 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या होत्या.

चमिराने त्याच्या कारकिर्दीत 119 टी20 सामने आत्तापर्यंत खेळले आहेत. यामध्ये त्याने 118 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याच्या 55 आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांचा समावेश आहे. त्याने 55 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 55 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahadevi Elephant: जनतेनं संघर्ष टाळावा, आमच्यासोबत उभं राहावं; वनतारानं स्पष्ट केली भूमिका; नेमकं काय केलंय आवाहन?

Friendship Day 2025: फ्रेंडशिप डे स्पेशल! तुमच्या जिगरी मित्राला पाठवा 'हे' खास संदेश

IND vs ENG: फलंदाजीतही 'दीप' चमकला! आकाश दीप विराट-सचिनच्या खास क्लबमध्ये सामील; अशी कामगिरी ठरला चौथा भारतीय खेळाडू

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT