KKR Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: KKR ने चाहत्यांना दिली भेट; नवी जर्सी लाँच, पाहा VIDEO

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यावेळी त्यांची अधिकृत जर्सी कधी लाँच करणार. अखेर होळीच्या दिवशी कोलकातानेही आपल्या चाहत्यांना होळीची भेट दिली आहे.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 चा हंगाम (IPL 2022) सुरु होण्यासाठी 10 दिवसच राहीले आहेत. जवळपास सर्व संघांनी त्यांच्या नवीन जर्सी लाँच केल्या आहेत. दुसरीकडे मात्र प्रत्येकजण प्रतीक्षा करत होता की, कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यावेळी त्यांची अधिकृत जर्सी कधी लाँच करणार. अखेर होळीच्या दिवशी कोलकातानेही आपल्या चाहत्यांना होळीची भेट दिली आहे. (Kolkata Knight Riders jersey has been launched)

याआधी सोशल मीडियावर केकेआरने आधीच माहिती दिली होती की, 'आम्ही शुक्रवारी 11 वाजता आपली जर्सी लॉन्च करणार आहोत. KKR ची नवीन जर्सी जांभळ्या आणि सोनेरी रंगाची आहे. जर्सी लाँचच्या वेळी संघाचा थेट कार्यक्रम ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर देखील उपस्थित होता. त्याने ही नवीन जर्सी घातली होती. यावेळी कॅप्टनने लाईव्ह कार्यक्रमात रंग लावून होळीही खेळली.'

दरम्यान, श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) केकेआरचे कर्णधारपद भूषवणार आहे. यापूर्वी तो दिल्लीचा कर्णधार होता. मध्यंतरी अय्यर जखमी झाल्यानंतर, डीसीने ऋषभ पंतला (Rishabh Pant) दिल्लीचा कर्णधार बनवले होते. त्यानंतर तो पुन्हा दिल्लीचा कर्णधार होऊ शकला नाही. श्रेयस अय्यर हा संघाचा 7 वा कर्णधार आहे. यापूर्वी सौरव गांगुली (Sourav Ganguly), ब्रेडन मॅक्युलम, गौतम गंभीर (Gautam Gambhir), दिनेश कार्तिक (Dinesh Karthik), इऑन मॉर्गन यांनी संघाचे नेतृत्व केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT