CSK vs DC Dainik Gomantak
क्रीडा

CSK vs DC: चेन्नई सुपर किंग्जसाठी प्लेऑफचे दरवाजे अजूनही खुले, जाणून घ्या कोण आहेत ते तीन खेळाडू

धोनीच्या या तीन दिग्गजांच्या जोरावर चेन्नईला (CSK) दिल्लीच्या (DC) विरोधात एवढा मोठा विजय नोंदवता आला.

दैनिक गोमन्तक

एमएस धोनी पुन्हा कर्णधार बनताच चेन्नई सुपर किंग्जने वेग पकडला आहे. IPL 2022 च्या 55 व्या सामन्यात CSK ने दिल्ली कॅपिटल्सचा 91 धावांनी पराभव केला. चेन्नईचा या मोसमातील हा चौथा विजय असून संघासाठी प्लेऑफचे दरवाजे अजूनही खुले आहेत.चेन्नईचे 11 सामन्यांतून 8 गुण आहेत आणि आता त्यांना त्यांचे पुढील सामने मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळायचे आहेत. (CSK vs DC IPL 2022 News)

दिल्लीविरुद्धच्या भरघोस मिळालेल्या विजयामध्ये चेन्नईच्या तीन खेळाडूंची कामगिरी चांगलीच होती. या तीन खेळाडूंच्या जोरावरच चेन्नईचा संघ दिल्लीला एवढा मोठा पराभव देऊ शकला. धोनीचे ते महान खेळाडू कोनाहेत हे जाणून घेऊया.

* मोईन अली

मोईन अली फलंदाजीत दिल्लीविरुद्ध विशेष काही करू शकला नाही आणि दोन चौकारांच्या मदतीने नऊ धावा काढून बाद झाला. मात्र, त्याने जबरदस्त गोलंदाजी करत सामना पूर्णपणे चेन्नईच्या बाजूने वळवला. मोईनने सामन्यात चार षटकांत 18 धावा देत 3 बळी घेतले.

* डेव्हॉन कॉनवे

सलामीवीर डेव्हन कॉनवेने चेन्नई सुपर किंग्जला चांगली सुरुवात करून दिली. या मोसमात त्याने सलग तिसरे अर्धशतक झळकावले. शतक झळकावताना तो हुकला, पण त्यानंतरही त्याने दिल्लीच्या गोलंदाजांना झोडपून काढले. कॉनवेने 49 चेंडूत 87 धावा केल्या आणि यादरम्यान त्याने 7 चौकार मारले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (DC) सामन्यात त्याने 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यातील अर्धशतकांनी सलग सामन्यात अर्धशतक ठोकणारा कॉनवे हा चेन्नईचा तिसरा फलंदाज ठरला. ही कामगिरी करणारा ऋतुराज गायकवाड हा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

* ऋतुराज गायकवाड

धोनी पुन्हा CSK संघाचा कर्णधार बनताच ऋतुराज गायकवाडची बॅटने जोर पकडला. गायकवाडने दिल्लीविरुद्ध 33 चेंडूंत 41 धावा केल्या, त्यात चार चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्याने डेव्हन कॉनवेसोबत पहिल्या विकेटसाठी 110 धावांची शतकी भागीदारी केली आणि चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT