KL Rahul likely to become new skipper in T20 games
KL Rahul likely to become new skipper in T20 games Twitter
क्रीडा

रोहित नाही तर हा होऊ शकतो भारताचा T20 चा कर्णधार

दैनिक गोमन्तक

येत्या काळात भारत आणि न्यूझीलंड (IndiavsNewZealand) मध्ये T20 मालिका होणार आहे. मायदेशी होणारे हे सामने भारतासाठी अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत. आणि अशातच साऱ्यांनाच प्रश्न पडला होता की या सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व नेमकं कोण करणार पण एका वृत्त वाहिनीच्या माहितीनुसार आगामी T20 मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध भारताचे नेतृत्व करण्यासाठी KL राहुलचे (KL Rahul) नाव आघाडीवर असल्याचे समजते आहे. (KL Rahul likely to become new skipper in T20 games)

ही मालिका 17 नोव्हेंबरला जयपूरमध्ये सुरू होणार असून त्यानंतरचे सामने अनुक्रमे 19 आणि 21 नोव्हेंबरला रांची आणि कोलकाता येथे खेळले जाणार आहेत. T20 नंतर या दोन देशांमध्ये 25-29 नोव्हेंबर रोजी कानपूर आणि 3-7 डिसेंबर दरम्यान मुंबई येथे दोन कसोटी सामने होणार आहेत.

अशातच भारताच्या T20 विश्वचषक संघातील सर्व खेळाडूंचे गेल्या वर्षभरात व्यस्त वेळापत्रक आहे, 2020 IPL पासून हे खेळाडू सतत मैदानावर आहेत. ज्यामुळे निवडकर्त्यांना पहिल्या पसंतीच्या खेळाडूंना विश्रांती देण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते. त्यांच्या अनुपस्थितीत, राहुल दुसऱ्या फळीतील संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.

आता टीमच्या काही खेळाडूंना विश्रांतीची गरज असून राहुल हा या संघाचा भाग असेल अशी माहिती BCCI च्या अधिकाऱ्याने एक वृत्तवाहिनीला दिली आहे. पुढे या अधिकाऱ्याने कोरोनच्या अनुषंगाने मैदानावर प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबतही भाष्य केले असून मर्यादित प्रेक्षकांना हे सामने मैदानातून पाहता येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

पृथ्वी शॉ, रुतुराज गायकवाड आणि मयंक अग्रवाल हे या मालिकेत राहुलसोबत सलामीचे काही प्रमुख दावेदार मानले जात आहेत, तर युझवेंद्र चहल आणि शिखर धवन, ज्यांची T20 विश्वचषक संघात निवड झाली नाही, त्यांनाही या सामन्यात संधी दिली जाण्याची शक्यता आहे.आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यांनतर आवेश खान, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, चेतन साकारिया आणि हर्षल पटेल यांची नावेही चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समिती या खेळाडूंची निवड करणार आहे.

या मालिकेसाठी संघ निवडीपासून अनेक प्रश्न आहेत कारण T 20 World Cup नंतर कोहलीच्या जागी रोहित शर्मा हे नाव असण्याची शक्यता आहे, मात्र न्यूझीलंड मालिकेसाठी तरी राहुलकडे संघाचे नेतृत्व येण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT