KL Rahul Dainik Gomantak
क्रीडा

KL Rahul ला कोरोनाची लागण, वेस्ट इंडिज दौरा रद्द

KL Rahul Corona Positive: आयपीएलनंतर तो जखमी झाला होता अशातच केएल राहुलला कोरोनाची लागण झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची वनडे सीरिज आजपासून सुरू होत आहे. यानंतर 29 जुलैपासून 5 सामन्यांची टी-20 सीरिज खेळली जाणार आहे. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू केएल राहुलला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे केएल राहुल टी-20 सीरिजमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत माहिती दिली आहे. (KL Rahul Corona Positive news)

22 जुलैपासून सुरु होणाऱ्या वनडे सीरीजसाठी टीम इंडियाच्या (Team India) अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर टी-20 सीरिजसाठी अनेक खेळाडू टीममध्ये परतणार आहेत. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. केएल राहुलही दुखापतीनंतर टीम इंडियात पुनरागमन करत आहे. आयपीएलनंतर तो जखमी झाला होता. पण अशातच केएल राहुलला कोरोनाची (Corona) लागण झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. सौरव गांगुली यांनी बोर्डाच्या बैठकीनंतर केएल राहुलला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली.

केएल राहुल गेल्या काही दिवसांपासून मांडीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. नुकतेच त्याचे जर्मनीत हर्नियाचे ऑपरेशन झाले. यानंतर केएल राहुल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (Cricket) परतण्याच्या तयारीत होता. यासाठी तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे सराव सुद्धा करत आहे. विंडीज दौऱ्यावर जाण्यासाठी त्याला एनसीएमध्ये फिटनेस चाचणी पास करायची होती. मात्र, त्यापूर्वीच त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसंच, कॉमनवेल्थ गेम्ससाठी महिला क्रिकेट टीममध्ये समाविष्ट करण्यात आलेली एक खेळाडूही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सौरव गांगुलींनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Richard Mille luxury watch: अंबानींची 'रॉयल' भेट! लिओनेल मेस्सीला दिलं 11 कोटींचं घड्याळ, 'रिचर्ड मिल' ब्रँडचं वैशिष्ट्यं काय?

सायबर गुन्ह्यांविरुद्ध 'मूग गिळून गप्प' बसू नका: तक्रार करा, साखळी तोडा!

थायलंड समजून गोव्यात येऊ नका! नाईटक्लब बंद करण्याची भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांची मागणी

कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

SMAT Final 2025: हरियाणा की झारखंड? कोण उंचावणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी? फायनल सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT