KL Rahul X/BCCI
क्रीडा

SA vs IND: केएल राहुलने मिळवलं धोनीच्या पंक्तीत स्थान! ODI मध्ये तब्बल 14 वर्षांनी केला असा कारनामा

KL Rahul: केएल राहुलने 14 वर्षांनंतर धोनीच्या विक्रमाची पुनरागवृत्ती केली आहे.

Pranali Kodre

South Africa vs India, 3rd ODI at Paarl, KL Rahul Record:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात गुरुवारी (21 डिसेंबर) तिसरा आणि शेवटचा वनडे सामना खेळवण्यात आला. पार्लला झालेल्या या वनडे सामन्यात भारताने 78 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने वनडे मालिकाही 2-1 अशा फरकाने जिंकली.

याच सामन्यादरम्यान भारताचा यष्टीरक्षक फलंदाज आणि कर्णधार केएल राहुलने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

यावर्षी केएल राहुल भारतीय संघाकडून यष्टीरक्षक म्हणून खेळला आहे. दरम्यान या सामन्यात केएल राहुलने 21 धावांची खेळी केली. ही खेळी करताना त्याने 2023 वर्षात वनडेत 1000 धावांचा टप्पा पार केला आहे.

केएल 2023 वर्षात 27 वनडेत 66.25 च्या सरासरीने 1060 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. यातील 23 सामने तो पूर्णवेळ यष्टीरक्षक म्हणून खेळला असून 802 धावा केल्या आहेत.

दरम्यान, केएल राहुल एका वर्षात 1000 वनडे धावा पूर्ण करणारा भारताचा दुसराच यष्टीरक्षक आहे. त्याच्यापूर्वी एमएस धोनीने असा पराक्रम केला होता. धोनीनंतर तब्बल 14 वर्षांनी भारताच्या यष्टीरक्षक फलंदाजाने एका वर्षात 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.

धोनीने 2007, 2008 आणि 2009 या तिन्ही वर्षी वनडेत 1000 धावांचा टप्पा ओलांडला होता. त्याने 2007 साली 37 सामन्यांत 1 शतकासह 1103 धावा केल्या होत्या. तसेच 2008 साली 29 सामन्यांत 1 शतकासह 1097 धावा त्याने केल्या होत्या, तर 2009 साली 29 वनडेत 2 शतके आणि 9 अर्धशतकांसह 1198 धावा केल्या होत्या.

भारताने जिंकला सामना

दरम्यान, गुरुवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताकडून संजू सॅमसनने 108 धावांची शतकी खेळी केली. तसेच तिलक वर्माने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली, तर रिंकू सिंगने 38 धावा केल्या. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 296 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत ब्युरान हेंड्रिक्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच नांद्रे बर्गरने 2 विकेट्स घेतल्या, तर लिझाद विल्यम्स, विआन मुल्डर आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर 297 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 45.5 षटकात 218 धावांवर सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून टोनी डी झोर्झीने 81 धावांची खेळई केली, तर कर्णधार एडेन मार्करमने 36 धावा केल्या आणि हेन्रिक क्लासेनने 21 धावांची खेळी केली. याशिवाय कोणालाही 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.

भारताकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंगने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. अवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT