Kevin Pietersen Dainik Gomantak
क्रीडा

रशियन हल्ल्यातून केविन पीटरसनचे कुटुंबीय बचावले, पत्नी अन् मुले आले पळून?

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि कमेंटेटर केविन पीटरसनचे (Kevin Pietersen) कुटुंब रशियन हल्ल्यातून वाचले आहे. सोशल मीडियावरुन पीटरसनने यासंबंधीची माहिती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि कमेंटेटर केविन पीटरसनचे कुटुंब रशियन हल्ल्यातून वाचले आहे. सोशल मीडियावरुन पीटरसनने यासंबंधीची माहिती दिली आहे. यावेळी त्याने म्हटले की, 'रशियाच्या आक्रमणादरम्यान माझे कुटुंब युक्रेनमध्ये (Ukraine) होते. मात्र युक्रेनमधून सुरक्षितरित्या माझी पत्नी आणि मुले बाहेर पडले. पीटरसनचे कुटुंब रशियन आक्रमणादरम्यान युक्रेनमध्ये अडकले होते. परंतु अथक प्रयत्नानंतर ते सीमा ओलांडून पोलंडमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाले. त्याचवेळी पीटरसनने पोलंड (Poland) सरकारचे आभार मानले, ज्याने आपल्या देशात 4 लाख युक्रेनियन नागरिकांना आश्रय दिला आहे. (Kevin Petersons Family Survives Russian Attack)

दरम्यान, केविन पीटरसनने ट्विट करत म्हटले की, 'मला एवढचं सांगायचं आहे की, पोलंड हे युक्रेनियन लोकांसाठी सुरक्षित ठिकाण आहे. माझे कुटुंबही युक्रेनची सीमा ओलांडून पोलंडला गेले आहे. धन्यवाद पोलंड.'

तसेच, केविन पीटरसनची पत्नी जेसिका पीटरसननेही पोलंडचे आभार मानले आहे. यावेळी जेसिका पीटरसनने ट्विट करत म्हटले की, 'पोलंड सरकारचे मी आभार मानते.'

शिवाय, रशियाने (Russia) 24 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर रशियन सैन्याने युक्रेनमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे मात्र रशियाच्या या निर्णयाचा जगभरातून विरोध होत आहे. अमेरिका आणि युरोपीय देश रशियाच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT