Kerala cricket team's efforts to defeat Goa cricket team Dainik Gomantak
क्रीडा

आघाडीसाठी जोरदार चुरस, गोव्याला मागे टाकण्यासाठी केरळचे प्रयत्न

दैनिक गोमन्तक

पणजी ः कर्नल सी. के. नायडू करंडक (25 वर्षांखालील) क्रिकेट (cricket) सामन्यात पहिल्या डावातील आघाडीसाठी चुरस असून गोव्याला मागे टाकण्यासाठी केरळ प्रयत्नशील आहे. एलिट एफ गटातील सामना अळूर-बंगळूर येथे सुरू आहे.

केरळच्या चार विकेट बाकी असून आघाडीसाठी त्यांना आणखी 42 धावांची गरज आहे. मध्यफळीतील शॉन रॉजर केरळसाठी दिवसभरातील ‘स्टार’ ठरला. त्याच्या धडाकेबाज दीडशतकामुळे (165) गुरुवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा गोव्याच्या (goa) 454धावांना उत्तर देताना केरळने पहिल्या डावात 6 बाद 413 धावा केल्या होत्या. दिवसाच्या अखेरच्या सत्रात कर्णधार दीपराज गावकरने जम बसलेल्या शॉन आणि अखिल स्कारिया (48) यांना बाद केल्यामुळे गोव्याला दिलासा मिळाला. गोव्यातर्फे दीपराजच यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार फलंदाज बाद केले. त्यामुळे केरळला अखेरच्या टप्प्यात दोन धक्के बसले.

तीन महत्त्वपूर्ण भागी

रॉजर याने केरळच्या (Kerala) डावाला आकार देताना तीन महत्त्वपूर्ण भागीदारी केल्या. कालचा नाबाद अर्धशतकवीर जे. अनंत कृष्णन (82) याच्यासमवेत त्याने तिसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. दीपराजने बलप्रीतसिंग छड्डा याच्याकरवी अनंत कृष्णनला झेलबाद केले. सलमान निझार जास्त काळ टिकला नाही. दीपराजने त्याला त्रिफळाचित बाद केले. मात्र नंतर 4 बाद 196 वरून रॉजरने अखिल याच्यासमवेत टिच्चून फलंदाजी केली. त्यामुळे केरळचा डाव लवकर गुंडाळणे गोव्याला शक्य झाले नाही. रॉजर व अखिल यांनी पाचव्या विकेटसाठी 141 धावांची भागीदारी केली. दीपराजच्या गोलंदाजीवर अखिल तुनीष सावकारच्या हाती झेल देऊन बाद झाला. चहापानानंतर रॉजर व अब्दुल बाझिथ यांनी आक्रमक फलंदाजी करत सहाव्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. दिवसातील2.3 षटकांचा खेळ बाकी असताना दीपराजच्या गोलंदाजीवर धोकादायक रॉजरचा मोहित रेडकरने पकडला. रॉजरने 257 चेंडूंतील खेळीत 17 चौकार व पाच षटकार मारले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः 454

केरळ, पहिला डाव (2 बाद 149वरून) ः 110 षटकांत 6 बाद 413 (जे. अनंत कृष्णन 82 , शॉन रॉजर 165 , सलमान निझार 14 , अखिल स्कारिया 48 , पी. ए. अब्दुल बाझिथ नाबाद 36, टी. निखिल नाबाद 0, समित आर्यन मिश्रा 20-2-80-0, ऋत्विक नाईक 29-7-96-1, दीपराज गावकर 19-2-73-4, मोहित रेडकर 24-5-80-1, बलप्रीतसिंग छड्डा 12-0-56-0, विश्वंबर काहलोन 4-1-14-0, तुनीष सावकार 2-0-3-0).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT