Kerala Blasters Kishor Petkar
क्रीडा

ISL Football Tournament : केरळा ब्लास्टर्स तिसऱ्यांदा अंतिम फेरीत

ISL : दुसऱ्या टप्प्यात 1-1 गोलबरोबरी, पण गोलसरासरीत जमशेदपूर 2-1 फरकाने मागे

दैनिक गोमन्तक

पणजी : केरळा ब्लास्टर्सने तिसऱ्यांदा इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आठव्या मोसमातील उपांत्य फेरीत दोन टप्प्यानंतर त्यांनी गोलसरासरीत यावेळच्या लीग विनर्स शिल्ड विजेत्या जमशेदपूर एफसीला 2-1 फरकाने मागे टाकले. (Kerala Blasters reached the final ISL football tournament)

वास्को (Vasco) येथील टिळक मैदानावर (Tilak Ground) मंगळवारी उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामना 1-1 गोलबरोबरीत राहिला. त्यापूर्वी पहिल्या टप्प्यात केरळा ब्लास्टर्सने 1-0 फरकाने विजय मिळविला होता. त्यामुळे त्यांची आगेकूच कायम राहिली. शिल्ड विजेत्या जमशेदपूरला प्रथमच अंतिम फेरी गाठण्याची संधी साधता आली नाही. यापूर्वी केरळा ब्लास्टर्सने 2014 व 2016 मध्ये स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती, पण दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर (Runner-up) समाधान मानावे लागले होते.

सामन्यात गोलबरोबरी

केरळा ब्लास्टर्सने 18 व्या मिनिटास अॅड्रियन लुना याने केलेल्या गोलमुळे आघाडी घेतली, त्यामुळे त्यांची उपांत्य फेरीतील गोलसरासरी 2-0 अशी वाढली. अल्वारो व्हाझकेझ याच्या असिस्टवर 29 वर्षीय उरुग्वेयन मध्यरक्षकाने मोसमातील सहावा गोल नोंदविला. नंतर 50 व्या मिनिटास प्रोणय हल्दर याच्या गोलमुळे जमशेदपूरची गोलसरासरीतील पिछाडी 1-2 अशी कमी झाली. त्यानंतर त्यांनी बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले, पण शक्य झाले नाही. स्पर्धेत 10 गोल केलेल्या जमशेदपूरच्या ग्रेग स्टुअर्ट याला सलग दुसऱ्या लढतीत गोल (Goal) करण्यात अपयश आले, त्यामुळे त्यांचे आक्रमण थिटे ठरले.

ऑफसाईड गोल

सामन्याच्या पूर्वार्धात दोन गोल ऑफसाईड ठरले. सामन्याच्या दहाव्या मिनिटास केरळा ब्लास्टर्सच्या (Kerala Blasters) जॉर्जे परेरा डायझ याने गोल केला, पण लाईनमनने ऑफसाईडची खूण केल्यामुळे अर्जेंटाईन खेळाडूचा जल्लोष अर्ध्यावरच थांबला. नंतर 36 व्या मिनिटास ग्रेग स्टुअर्टच्या असिस्टवर डॅनियल चिमा चुक्वू याने केलेला गोल अवैध ठरल्यामुळे जमशेदपूरच्या गोटात कमालीची निराशा पसरली. 51 व्या मिनिटास केरळा ब्लास्टर्सला आघाडीची सुरेख संधी होती, पण अल्वारो व्हाझकेझ याचा फटका जमशेदपूरच्या (Jamshedpur) एली साबिया याने गोलरेषेवरून परतावून लावल्यामुळे 1-1 गोलबरोबरी कायम राहिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

SCROLL FOR NEXT