Goa Cricket Association Dainik Gomantak
क्रीडा

करिमाबादचे ‘साळगावकर’ वर वर्चस्व, 127 धावात गुंडाळला सामना

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्याच्या रणजी क्रिकेट संघाचे दार ठोठावणाऱ्या ऋत्विक नाईक याने सोमवारी सांगे येथील जीसीए मैदानावर अतिशय भेदक मारा केला. या युवा वेगवान गोलंदाजाने जबरदस्त मारा करताना सात जणांना माघारी धाडले. त्यामुळे गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यात धेंपो क्रिकेट क्लबचा पहिला डाव 127 धावांत गुंडाळणे जीनो स्पोर्टस क्लबला शक्य झाले. आणखी एका सामन्यात करिमाबाद क्लबने साळगावकर क्रिकेट क्लबवर वर्चस्व राखले.

उत्तर प्रदेशविरुद्ध कर्नल सी. के. नायडू करंडक (25 वर्षांखालील) क्रिकेट सामन्यातील पहिल्या डावात 6 गडी बाद केलेल्या ऋत्विकने पुन्हा एकदा जोशपूर्ण मारा केला. त्याने 18.2 षटकांत 34 धावांच्या मोबदल्यात 7 गडी बाद केले. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय धेंपो क्लबच्या अंगलट आला.

ऋत्विकच्या दाहक माऱ्यामुळे त्यांनी अखेरच्या 8 विकेट अवघ्या 32 धावांत गमावल्या. दिवसअखेर जीनो क्लबने 3 बाद 117 धावा केल्या. आघाडीसाठी त्यांना फक्त 10 धावांची गरज आहे. अमोघ देसाई (54) व समर दुभाषी (33) यांनी चौथ्या विकेटसाठी 74 धावांची अभेद्य भागीदारी केली.

करिमाबाद प्रभावी

अगोदरच्या लढतीत एमसीसी संघाला डावाने हरविलेल्या करिमाबाद क्लबने सलग दुसऱ्या लढतीत दमदार फॉर्म कायम राखला. पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर पहिल्या डावात 245 धावा केल्यानंतर करिमाबादने दिवसअखेर साळगावकर क्लबची स्थिती 5 बाद 62 अशी नाजूक केली. माजी विजेते अजून 183 धावांनी मागे आहेत. करिमाबाद क्लबचा डाव सावरताना कश्यप बखले (76) याने दोन महत्त्वपूर्ण भागीदारी केल्या. त्याने अझान थोटा (55) याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी 105 धावांची, तर तुनीष सावकार (15) याच्यासह तिसऱ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT