State level badminton match  Dainik Gomantak
क्रीडा

Goa Sports : साखळीच्या करणची विजयी झेप

किशोर पेटकर

Goa Sports : राज्यस्तरीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत साखळीच्या करण धावसकर याने संस्मरणीय कामगिरी नोंदविताना पुरुष एकेरीत विजेतेपद पटकावले. त्याने तीन गेममधील चुरशीच्या लढतीत उमाकांत सर्गे याच्यावर 21-13, 22-24, 21-19 असा रोमहर्षक विजय नोंदविला.

मुरगाव बॅडमिंटन क्लबने गोवा बॅडमिंटन असोसिएशनच्या सहकार्याने घेतलेली स्पर्धा चिखली-वास्को येथील इनडोअर स्टेडियममध्ये झाली. महिला एकेरीत अंजना कुमारी विजेती ठरली. पहिला गेम जिंकल्यानंतर प्रतिस्पर्धी लिडिया बार्रेटो हिला सामना सोडून द्यावा लागला, त्यामुळे ती दुहेरीतील अन्य दोन अंतिम लढतीतही खेळू शकली नाही.

बॅडमिंटन स्पर्धेत तेजन फळारी व आर्यमान सराफ यांनी दुहेरी किताब पटकावला, तसेच 19 वर्षांखालील गटातील एकेरीत अनीश कामत, जान्हवी महाले यांनी विजेतेपद प्राप्त केले. आरोही कवठणकर, अभिषेक स्वामी, अर्फान सय्यद, अनुज वेर्णेकर, अश्मीत पार्सेकर, अयान शेख, चिराग महाले, देवेश गोएल, जान्हवी विर्नोडकर, रितिका छेलुरी, शाहीन सीके, जोश कुमार यांना उदयोन्मुख खेळाडूचे बक्षीस मिळाले.

अंतिम निकाल

19 वर्षांखालील गट : मुलगे एकेरी : अनीश कामत वि. वि. यश देसाई 21-12, 20-22, 21-19, मुली एकेरी : जान्हवी महाले वि. वि. निधी देसाई 21-18, 21-13.

19 वर्षांखालील गट : मुलगे दुहेरी : यश हळर्णकर व आर्यमान सराफ वि. वि. प्रणव नाईक व यश देसाई 21-15, 21-13, मुली दुहेरी : प्रतिष्ठा शेणॉय व सिनोव्हिया डिसोझा वि. वि. रिया हळदणकर व मिनोष्का परेरा 21-15, 21-10, मिश्र दुहेरी : आर्यमान सराफ व मिनोष्का परेरा वि. वि. यश हळर्णकर व निधी देसाई 21-18, 14-21, 21-19.

महिला एकेरी : अंजना कुमारी वि. वि. लिडिया बार्रेटो 9-21, 12-10 (सामना सोडला), महिला दुहेरी : अनार सिंगबाळ व नेहा सहकारी वि. वि. लिडिया बार्रेटो व यास्मिन सय्यद (सामना सोडला).

पुरुष एकेरी : करण धावसकर वि. वि. उमाकांत सर्गे 21-13, 22-24, 21-19, पुरुष दुहेरी : तेजन फळारी व अर्जुन फळारी वि. वि. फ्लॉईड अरावजो व फ्रेड्रिक फर्नांडिस 21-8, 24-22, सीनियर मिश्र दुहेरी : तेजन फळारी व यास्मिन सय्यद वि. वि. अर्जुन फळारी व लिडिया बार्रेटो (सामना सोडला).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT