Kane Williamson run out X
क्रीडा

Kane Williamson Run Out: मैदानात जोरदार धडक अन् विलियम्सन डकवर रनआऊट, पाहा वेलिंग्टन कसोटीतील नाट्यमय घटना

Australia vs New Zealand: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत केन विलियम्सनने नाट्यमयरित्या धावबाद झाला.

Pranali Kodre

Kane Williamson run out after collided with Will Young

न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारपासून (29 फेब्रुवारी) कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. या सामन्याला पहिल्या दिवसापासून रोमांचक वळण मिळाले आहे. त्यातच दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियम्सन नाट्यमयरित्या धावबाद झाला.

झाले असे की वेलिंग्टनला होत असलेल्या या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपल्यानंतर न्यूझीलंड संघ फलंदाजीला उतरला होता. पण पाचव्या षटकाच्या चौथ्याच चेंडूवर टॉम लॅथमला 5 धावांवर मिचेल स्टार्कने त्रिफळाचीत केले.

त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेला केन विलियम्सन फलंदाजीला आला होता. त्याने या 5 व्या षटकातील अखेरचा चेंडू मिड-ऑफच्या दिशेने मारला. त्यावेळी त्याने विल यंगबरोबर एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण ही धाव घेताना दोघेही चेंडूकडे पाहात होते.

त्यामुळे धावताना अचानक दोघांची जोरदार धडक झाली. त्यातच मार्नस लॅब्युशेनने चपळाईने पकडलेला चेंडू थेट नॉन-स्ट्रायकर एन्डच्या स्टंपवर मारला. त्यामुळे विलियम्सन क्रिजमध्ये परतण्यापूर्वीच बेल्स उडाल्याने त्याला शुन्यावरच बाद होऊन माघारी परतावे लागले.

झालेली घटना पाहून मैदानातील सर्वचजण चकीत झाले होते. पण याचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला. कारण त्यांना 5 व्या षटकात लॅथमबरोबरच विलियम्सनची विकेटही मिळाली.

दरम्यान, न्यूझीलंडला त्यानंतरीही मोठे धक्के बसले. त्यांनी अवघ्या 29 धावांत 5 विकेट्स गमावल्या होत्या. परंतु, नंतर ग्लेन फिलिप्सने 71 धावांची आक्रमक खेळी केली. तसेच मॅट हेन्रीने 42 धावा आणि टॉम ब्लंडेलने 33 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 43.1 षटकात 1 बाद 179 धावा अशी समाधानकारक धावसंख्या गाठता आली.

ऑस्ट्रेलियाकडून या डावात गोलंदाजी करताना नॅथन लायनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तसेच जोश हेजलवूडने 2 विकेट्स घेतल्या, तर मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात कॅमेरॉन ग्रीनने 174 धावांची नाबाद खेळी केली. त्याने जोश हेजलवूडबरोबर 10 व्या विकेटसाठी 116 धावांची शतकी भागीदारी केली. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने 115.1 षटकात सर्वबाद 383 धावा केल्या.

दुसऱ्या डावात मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शानदार सुरुवात केली. पहिल्याच षटकात कर्णधार टीम साऊथीने स्टीव्ह स्मिथला शुन्यावर त्रिफळाचीत केले. त्यानंतर पाचव्या षटकात साऊथीनेच मार्नस लॅब्युशेनला 2 धावांवर बाद केले.

त्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 8 षटकामध्ये 2 बाद 13 धावा केल्या. पण पहिल्या डावातील 204 धावांच्या आघाडी घेतल्याने सध्या ऑस्ट्रेलिया 217 धावांनी पुढे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT