Kane Williamson ICC
क्रीडा

Kane Williamsonचे शतक हुकले, पण केला मोठा पराक्रम! न्यूझीलंडचा वर्ल्डकपमधील बनला 'नंबर वन' फलंदाज

New Zealand vs Pakistan: केन विलियम्सनने वर्ल्डकप 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 95 धावांची खेळी करत मोठा विक्रम केला आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, New Zealand vs Pakistan, Kane Williamson Record:

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात शनिवारी (4 नोव्हेंबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सामना खेळवला जात आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर 402 धावांचे आव्हान ठेवले आहे.

न्यूझीलंडकडून रचिन रविंद्रने शतक केले, तर केन विलियम्सननेही शानदार खेळी केली. विलियम्सनने 79 चेंडूत 95 धावांची खेळी केली. याबरोबरच केन विलियम्सनने एक मोठा विक्रम केला आहे. तो वनडे वर्ल्डकपमधील न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे.

विलियम्सनने वनडे वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडकडून १००० धावांचा टप्पा पार केला आहे. याबरोबरच तो आता वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा न्यूझीलंडचा फलंदाजही ठरला आहे. त्याने स्टीफन फ्लेमिंग आणि रॉस टेलर यांना मागे टाकत हा विक्रम केला आहे.

विलियम्सनच्या वनडे वर्ल्डकपमध्ये 25 सामन्यांतील 24 डावात 1084 धावा केल्या आहेत. तसेच न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग यांनी वनडे वर्ल्डकपमध्ये 33 सामन्यात 1075 धावा केल्या आहेत. त्यापाठोपाठ रॉस टेलरने वनडे वर्ल्डकपमध्ये 30 डावात 1002 धावा केल्या आहेत. या तिघांनाच वनडे वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडकडून 1000 पेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत.

  • वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारे न्यूझीलंडचे क्रिकेटपटू -

    • 1084 धावा - केन विलियम्सन (24 डाव)

    • 1975 धावा - स्टीफन फ्लेमिंग (33 डाव)

    • 1002 धावा - रॉस टेलर (30 डाव)

    • 995 धावा - मार्टिन गप्टील (27 डाव)

    • 909 धावा - स्कॉट स्टायरिस (22 डाव)

न्यूझीलंडच्या 401 धावा

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 बाद 401 धावा केल्या. न्यूझीलंडकडून रचिन रविंद्रने सर्वाधिक 108 धावांची खेळी केली. ही खेळी त्याने 94 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकारासह केली. तसेच विलियम्सनने 95 धावा केल्या. त्याचबरोबर ग्लेन फिलिप्सने 41 धावा केल्या, तर मार्क चॅपमनने 39 धावांची खेळी केली.

पाकिस्तानकडून मोहम्मद वसिम ज्युनियरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच हसन अली, इफ्तिखार अहमद आणि हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

SCROLL FOR NEXT