Kane Williamson retires from international cricket Dainik Gomantak
क्रीडा

Kane Williamson Retirement: न्यूझीलंड क्रिकेटचा सुवर्ण अध्याय संपला! केन विल्यमसनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; लॉर्ड्स कसोटी संपताच चाहत्यांना मोठा धक्का VIDEO

Kane Williamson International Cricket Retirement: न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार केन विल्यमसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

Manish Jadhav

Kane Williamson International Cricket Retirement: जागतिक क्रिकेटमधील आधुनिक काळातील महान फलंदाजांपैकी एक आणि न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार केन विल्यमसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. इंग्लंड दौऱ्यावर ऐतिहासिक लॉर्ड्स कसोटी सामना संपल्यानंतर विल्यमसनने हा अत्यंत मोठा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विल्यमसनच्या नावावर आहे.

आपल्या 16 वर्षांच्या प्रदीर्घ आणि चमकदार कारकिर्दीत त्याने तिन्ही फॉरमॅट मिळून एकूण 19,346 धावा केल्या असून, यादरम्यान त्याने 48 शतके ठोकली. विल्यमसनने काही काळापूर्वीच मर्यादित षटकांच्या (वनडे आणि टी-20) क्रिकेटमधून स्वतःला दूर केले होते, आणि आता त्याने कसोटी क्रिकेटलाही रामराम ठोकल्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा अधिकृतरित्या शेवट झाला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करताना विल्यमसनने एक भावनिक पोस्ट केली. तो म्हणाला की, मी गेल्या बऱ्याच काळापासून या निर्णयाचा विचार करत होतो आणि गेल्या काही दिवसांत मला जाणीव झाली की आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याची हीच योग्य वेळ आहे. न्यूझीलंडकडून खेळणे हे माझे नेहमीच स्वप्न होते आणि मी जितके सामने देशासाठी खेळलो, त्यात मी 100 टक्के योगदान दिले याचा मला आनंद आहे. स्वतःच्या अटींवर आणि सन्मानाने निवृत्ती घेता आली, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. न्यूझीलंड संघाचे भविष्य अत्यंत उज्ज्वल असून संघात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. इतका मोठा काळ या संघाचा भाग असणे माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि या आठवणी नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ राहतील.

केन विल्यमसनच्या (Kane Williamson) कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याच्याच नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने 2019च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलपर्यंत मजल मारली होती, जिथे विल्यमसनला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'चा किताब मिळाला होता. याशिवाय, त्याने 2019 मध्ये आयसीसी टेस्ट प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कारही जिंकला होता. त्याच्या नावावर कसोटीत 9515 धावा, वनडेमध्ये 7256 धावा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2575 धावांची नोंद आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, न्यूझीलंडने केनच्याच नेतृत्वाखाली पहिल्यावहिल्या 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप'चे (WTC) विजेतेपद पटकावून इतिहास रचला होता.

फलंदाजीसोबतच कर्णधार म्हणूनही विल्यमसनचा रेकॉर्ड अत्यंत उत्कृष्ट राहिला आहे. त्याने नेतृत्व केलेल्या 40 कसोटींपैकी 22 सामन्यांत न्यूझीलंडने विजय मिळवला, तर केवळ 10 सामन्यांत पराभव पत्करावा लागला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 91 पैकी 46 सामने जिंकले, तर 75 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी 39 सामन्यांत संघाला विजय मिळवून दिला. शांत, संयमी आणि मैदानातील सुसंस्कृत वर्तनासाठी ओळखल्या जाणाऱ्या केन विल्यमसनच्या या निवृत्तीमुळे क्रिकेट जगतातील एका सुवर्ण अध्यायाचा अंत झाला असून जगभरातील चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT