Dominique Metzger Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup कव्हर करायला गेलेल्या महिला पत्रकाराला लुटले, VIDEO व्हायरल

Journalist Dominique Metzger: पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेले उत्तर ऐकून तिला धक्का बसला. या महिला पत्रकाराचे डॉमनिक मेट्झगर असे नाव आहे.

दैनिक गोमन्तक

FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली असली, तरी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्जेंटीनाची एक महिला पत्रकार सामन्याचे वृत्तांकन करत असताना तिची पर्स चोरीला गेली असल्याचे समजत आहे. त्यासाठी तिने पोलिसांचीही मदत मागितली. पण पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेले उत्तर ऐकून तिला धक्का बसला. या महिला पत्रकाराचे डॉमनिक मेट्झगर असे नाव आहे.

रिपोर्टनुसार, डॉमनिकने सांगितले की, ‘मी जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये गेले, तेव्हा तिथे सांस्कृतिक भेदभाव सुरु झाला. एका महिला पोलिस (Police) अधिकाऱ्याने मला सांगितले की, आमच्याकडे हाय-टेक कॅमेरे आहेत आणि आम्ही चोराला त्याच्या चेहऱ्याची ओळख करुन पकडू. पण जेव्हा आम्ही त्याला पकडू, तेव्हा तुम्ही त्याला काय शिक्षा देणार?’

दुसरीकडे, मात्र हे ऐकून डॉमनिकने याबाबत पोलिसांना स्पष्टता विचारली. त्यावर महिला अधिकाऱ्याने सांगितले की, ‘तुम्हाला कसा न्याय हवा आहे? तुम्ही त्याला 5 वर्षांसाठी तुरुंगवासात पाठवणार का? तुम्ही त्याला निर्वासित करु इच्छिता का?’ त्यावर, डॉमनिकने मागणी केली की, 'त्याने चोरलेल्या माझ्या वस्तू पुन्हा परत करायला हव्यात, बस्स..'

तसेच, डॉमनिकने आपल्या बाबतीत घडलेली ही घटना टीव्हीवर देखील सांगितल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार तिने सांगितले की ‘जेव्हा आम्ही लाईव्ह ब्रॉडकास्ट करत होतो, तेव्हा माझी पर्स चोरीस गेली. त्यानंतर मी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. मला माझ्या कागदपत्रांची काळजी आहे. त्यामुळे आता काय होतयं, हे पाहू. काही अनुभव असे असतात, जे तुम्हाला अपेक्षित नसतात पण तुम्हाला काहीतरी नक्कीच शिकवून जातात.’

दरम्यान, गेल्या काही दिवसात कतारमधील सुरक्षा चर्चेचा विषय ठरत आहे. दुसरीकडे, असेही म्हटले जात आहे की, कोणताही अनुभव नसलेल्या शेकडो लोकांना स्टेडीयममध्ये रक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

शिवाय, स्पर्धेबद्दल बोलायचे झाल्यास, यजमान कतारला (Qatar) पहिल्याच सामन्यात इक्वेडोरकडून 0-2 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT