Jose Butler dance video with Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma  Dainik Gomantak
क्रीडा

चहलची पत्नी धनश्री सोबतचा जोस बटलरचा डान्स व्हिडीओ झाला व्हायरल

धनश्री वर्माचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

दैनिक गोमन्तक

आयपीएलच्या 15 व्या मोसमात अंतिम फेरीत पोहोचलेल्या राजस्थान रॉयल्स (RR) संघाचा अनुभवी लेग-स्पिनर युजवेंद्र चहलची आणि (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री वर्माचा (Dhanashree Verma) एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. (Jose Butler dance video with Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma has gone viral)

या व्हिडिओमध्ये धनश्री वर्मा पती युजवेंद्र चहल आणि राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) यांना डान्स मूव्ह्स शिकवताना दिसून येत आहे. आयपीएलच्या फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सचा गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans) पराभव झाला, पण ऑरेंज आणि पर्पल कॅपवर राजस्थानचे खेळाडू माणकरी राहिले.

धनश्री वर्माने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये चहल आणि बटलर धनश्रीसोबत डान्स करत आहेत. काही वेळाने बाजूला उभा राहून चहल पत्नी धनश्री आणि बटलरच्या डान्स मूव्ह्ज पाहू लागतो.

नंतर बटलर भारतीय फिरकी गोलंदाज चहलची फेमस स्टेप कॉपी करताना दिसत आहे. चहलही त्यावेळी बटलरसोबत स्टेप करतो. डान्सनंतर बटलरने चहल आणि धनश्रीला मिठी देखील मारली. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला असून ते चाहते कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT