Joe Root Dainik Gomantak
क्रीडा

ICC Test Rankings: ऑस्ट्रेलियन दिग्गजाला मागे टाकत जो रुट बनला नंबर वन फलंदाज

दैनिक गोमन्तक

ICC Test Rankings: आयसीसी कसोटी क्रमवारीत जो रुटने पुन्हा एकदा आपला करिष्मा दाखवला आहे. सलग दोन सामन्यांत दोन शतके झळकावणारा जो रुट पुन्हा कसोटी क्रिकेटमधील नंबर वन फलंदाज बनला आहे. जो रुटने ऑस्ट्रेलियन दिग्गज मार्नस लॅबुशेनला मागे टाकत पुन्हा नंबर वनची खुर्ची मिळवली आहे. जो रुट हा यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाचा फलंदाज होता आणि तो बराच काळ अव्वल 10 मध्येही राहिला आहे. (joe root becomes no 1 test batter in the latest icc test rankings)

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात जो रुटने (Joe Root) शतक झळकावले. या जोरावर त्याने आधी दुसरा आणि नंतर पहिला नंबर पटकवला आहे. जो रुटच्या खात्यात सध्या 897 रेटिंग पॉईंट्स आहेत, तर मार्नस लाबुशेनच्या खात्यात 892 गुण आहेत. तिसर्‍या क्रमांकावर स्टीव्ह स्मिथ आहे, ज्याच्या खात्यात 845 गुण आहेत. बाबर आझम 815 गुणांसह चौथ्या आणि केन विल्यमसन 798 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

त्याचवेळी, अष्टपैलू खेळाडूंच्या कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजा 385 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांच्या खात्यात 341 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर जेसन होल्डर असून त्याच्या खात्यात 336 गुण आहेत आणि शाकिब अल हसन 327 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या क्रमांकावर इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आहे, त्याच्या खात्यात 307 गुण आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT