Jay Shah X/BCCI
क्रीडा

Jay Shah: आशियाई क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा जय शाह यांचे 'राज्य'; ACC च्या अध्यक्षपदी फेरनिवड

Jay Shah: जय शाह यांची आशियाई क्रिकेट काऊंन्सिलच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे.

Pranali Kodre

Jay Shah re-appointed as ACC president:

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांना पुन्हा एकदा आशियाई क्रिकेट काउंन्सिलच्या (ACC) अध्यक्षपदी निवडण्यात आले आहे. त्यांचा कार्यकाळ आणखी एक वर्षाने एकमताने वाढवण्यात आला.

बालीमध्ये बुधवारी झालेल्या एसीसीच्या वार्षिक सभेत जय शाह यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, यामुळे ते आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी दावा ठोकणार की नाही याबाबत मात्र आता संभ्रम निर्माण झाला आहे. कारण अशी चर्चा होती की शाह हे येत्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढणार आहे. पण आता, त्यांचा एसीसीच्या अध्यक्षपदी कार्यकाळ वाढवल्याने याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, एसीसीच्या बैठकीत श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी शाह यांचा कार्यकाळ वाढवण्याबाबत प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर त्यांच्या नावाला एकमताने सर्व एसीसी सदस्यांनी पसंती दाखवली.

शाह यांनी जानेवारी 2021 मध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांच्याकडून एसीसीच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली होती. आता पुन्हा एकदा शाह या पदावर नियुक्त झाले आहेत.ते एसीसी अध्यक्षपदी पुन्हा नियुक्त होणारे सर्वात तरुण प्रशासक आहेत.

एसीसीचे अध्यक्षपद आयसीसीच्या पूर्ण सदस्य असलेल्या एसीसीमधील सदस्य देशांमध्ये रोटेट होत असते. पण शाह हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांना सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.

पुन्हा अध्यक्ष्यपदी नियुक्त झाल्यानंतर जय शाह यांनी म्हटले की 'मला आनंद आहे की एसीसी बोर्डाने माझ्यावरील विश्वास कायम ठेवला आहे. या खेळातील सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असायला हवे. ज्या क्षेत्रात खेळाचा विकास अद्याप बाल्यअवस्थेत आहे, त्यावर विशेष लक्ष्य केंद्रित करायला हवे. एसीसी संपूर्ण आशियामधील क्रिकेटचे जतन करण्यासाठी वचनबद्ध आहे.'

जय शाह यांच्या अध्यक्षपदाखाली एसीसीने 2022 मध्ये टी20 आशियाई चषक आणि 2023 मध्ये वनडे आशियाई चषक स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Army Jawan Assaulted: देशरक्षकच असुरक्षित? लष्कराच्या जवानाला टोल नाक्यावर खांबाला बांधून मारहाण, 6 जण अटकेत

Heavy Rain in Goa: राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा; 100 इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद

Pune-Sindhudurg Flight: पुण्यातील कोकणवासियांना बाप्पा पावला... गणेश चतुर्थीनिमित्त 'Fly91'च्या उड्डाण संख्येत वाढ, वाचा सविस्तर

Memu Special Train: कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 'या' मार्गावर धावणार अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन

कारच्या धडकेत एका मुलीसह आठ जण जिवंत जाळले; गुजरातमधील घटना

SCROLL FOR NEXT