Neeraj Chopra and Arshad Nadeem Dainik Gomantak
क्रीडा

कामगिरीच नाही, मनही सोन्यासारखे! नीरजची कृती अन् नदीमच्या वक्तव्याने जिंकलं भारत-पाकिस्तान चाहत्यांचं हृदय

Neeraj Chopra - Arshad Nadeem: वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेत पदके जिंकल्यानंतर भारताचा नीरज चोप्रा आणि अर्शद नदीमने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Pranali Kodre

Neeraj Chopra and Arshad Nadeem heart winning gesture after winning medals in World Athletics Championships 2023:

वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेत रविवारी (27 ऑगस्ट) रात्री भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. तसेच पाकिस्तानच्या अर्शद नदीमने रौप्य पदक जिंकले.

दरम्यान पुरुषांची भालाफेकीच्या अंतिम फेरीनंतर नीरज आणि अर्शदमधील भाईचारा दिसून आला. अंतिम फेरी संपल्यानंतर पदक विजेते खेळाडू निश्चित झाल्यावर नीरज आणि नदीमने एकमेकांची गळाभेट घेतली.

तसेच त्यानंतर नीरज भारतीय तिरंगा घेऊन कांस्य पदक विजेता चेक गणराज्यचा जाकुब वडलेजचसह फोटो सेशनसाठी उभा होता. यावेळी त्याने केलेल्या कृतीने सर्वांचेच मन जिंकले. त्याने फोटो काढण्यावेळी रौप्य पदक जिंकलेल्या नदीमलाही बोलावून घेतले.

त्यावेळी नदीमकडे पाकिस्तानचा झेंडा नव्हता. पण तरी तोही नीरजच्या आग्रहाखातर फोटोसाठी आला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

रविवारी नीरजने 88.17 मीटर भाला फेकीसह सुवर्ण पदकावर नाव कोरले. तसेच पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 87.82 मीटर भाला फेकीसह रौप्य पदक जिंकले, तर चेक गणराज्यचा जाकुब वडलेजचने 86.67 मीटर भाला फेक करत कांस्य पदक जिंकले.

रविवारी झालेल्या अंतिम फेरीनंतरही अर्शदच्या वक्तव्यानेही अनेकांची मने जिंकली आहेत. तो म्हणाला, 'मी नीरज भाईसाठी खूप खूश आहे. भारत आणि पाकिस्तान जगात पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. इंशाअल्लाह आशा आहे आम्ही ऑलिम्पिकमध्येही पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असू.'

दरम्यान, नीरज आणि अर्शद यांनी पुढीलवर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्येही हे दोन खेळाडू एकमेकांसमोर तगडे आव्हान उभे करताना दिसतील. पण, असे असले तरी या दोघांमध्ये कडूता नाही.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की नीरज आणि नदीम या दोघांनीही आपापल्या देशासाठी रविवारी इतिहास रचले आहेत. वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. तसेच नदीम वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक जिंकणारा पाकिस्तानचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Trafficking: गोवा पोलिसांची धडक कारवाई! स्विगी डिलिव्हरी एजंटला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक; 'इतक्या' हजारांचा गांजा जप्त

AUS vs SA: इतिहास घडला...! ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षीय पठ्ठ्यानं दक्षिण आफ्रिकेची तगडी फलंदाजी केली ध्वस्त; मोडला 38 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral Video: 'मत रो मेरे दिल...'! दारुच्या नशेत पकडल्यावर पठ्ठ्याला बायकोची आठवण, गाण्याला पोलिसानंही दिली साथ; व्हिडिओ एकदा बघाच

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

SCROLL FOR NEXT