Jasprit Bumrah Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: यॉर्कर किंगचा नवा कारनामा! मलिंगाचा रेकॉर्ड मोडत बुमराह ठरला 'बोल्ड'चा बादशाह; द. आफ्रिकेविरुद्ध केली कमाल VIDEO

Jasprit Bumrah Beats Lasith Malinga Record: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक फलंदाजांना 'बोल्ड' करण्याच्या बाबतीत बुमराहने श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याला मागे टाकले आहे.

Manish Jadhav

Jasprit Bumrah Beats Lasith Malinga Record: टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात केली असून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उभय संघांमधील थरार पाहायला मिळत आहे. या महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन माक्ररमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

आफ्रिकन फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत निर्धारित 20 षटकांत 7 बाद 187 धावांचा डोंगर उभा केला. भारतीय गोलंदाजांसाठी ही धावसंख्या रोखणे कठीण जात असताना, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मात्र आपल्या भेदक माऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बुमराहने आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 15 धावा देत 3 महत्त्वपूर्ण बळी घेतले. एका बाजूने आफ्रिकी फलंदाज धावांचा पाऊस पाडत असताना बुमराहने धावगतीवर अंकुश ठेवून भारताला सामन्यात टिकवून ठेवण्याचे काम केले.

या शानदार कामगिरीसह जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक फलंदाजांना 'बोल्ड' करण्याच्या बाबतीत बुमराहने श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याला मागे सोडले. मलिंगाने आपल्या कारकिर्दीत 43 फलंदाजांना बोल्ड केले होते, मात्र आता बुमराहने 44 बोल्ड विकेट्ससह या यादीत दुसरे स्थान पटकावले.

या जागतिक क्रमवारीत अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान 58 बोल्ड विकेट्ससह अव्वल स्थानी आहे. हाँगकाँगचा एहसान खान 44 बोल्डसह बुमराहच्या बरोबरीने आहे, परंतु मोठ्या संघांविरुद्धची बुमराहची ही आकडेवारी त्याचे जागतिक क्रिकेटमधील वर्चस्व सिद्ध करते. वानिंदू हसरंगा देखील 42 विकेट्ससह या शर्यतीत आहे, पण मलिंगासारख्या महान गोलंदाजाला मागे सोडणे बुमराहच्या कारकिर्दीतील एक सुवर्णक्षण ठरला.

एकीकडे जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेवर धाक निर्माण केला, तर दुसरीकडे भारतीय संघातील इतर गोलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. बुमराहने आपल्या 4 षटकांत केवळ 15 धावा दिल्या, याचाच अर्थ उर्वरित 16 षटकांत इतर गोलंदाजांनी तब्बल 172 धावा लुटवल्या. वरुण चक्रवर्ती, हार्दिक पांड्या आणि इतर गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अक्षरशः धारेवर धरले.

बुमराहने विकेट्स घेत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र दुसऱ्या टोकाकडून त्याला अपेक्षित साथ मिळू शकली नाही. 188 धावांचे हे मोठे आव्हान पार करण्यासाठी आता भारतीय फलंदाजांना अहमदाबादच्या खेळपट्टीवर आपली ताकद दाखवावी लागणार आहे. भारताच्या विजयाची भिस्त आता फलंदाजीवर असून, बुमराहच्या या ऐतिहासिक विक्रमाचे विजयात रूपांतर करण्याचे मोठे आव्हान संघासमोर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: कॅन्सरवर मात करुन 10 वर्षांनंतर संघात परतला, पण 33 चेंडू खेळूनही खातं उघडता आलं नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Jeffrey Archer: संसद ते तुरुंग अन् तिथून 'बेस्टसेलर' लेखकापर्यंत! जेफ्री आर्चर यांचा थक्क करणारा प्रवास

Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या ‘नावी’ पिल्लई यांना मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; न्यायासाठीचा संघर्ष ठरला यशस्वी

Arjun Tendulkar Injury: अर्जुन तेंडुलकरला दुखापतीचा फटका; गोव्याच्या रणजी सलामीच्या सामन्याला मुकणार!

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

SCROLL FOR NEXT