Jasprit Bumrah X/ICC
क्रीडा

IND vs ENG: बुमराहवर ICC कडून मोठी कारवाई! इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीदरम्यान झाली 'ही' चूक

Pranali Kodre

Jasprit Bumrah reprimanded for breaching ICC Code of Conduct during India vs England first Test in Hyderabad:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील हैदराबादला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 28 धावांनी विजय मिळवला. याच सामन्यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एका चूकीसाठी आयसीसीने फटकारले असून कारवाईही केली आहे.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी (28 जानेवारी) आयसीसीच्या आचार संहितेतील नियमातील लेव्हल-1 चे उल्लंघन केल्यामुळे बुमराहला फटकारले आहे. तसेच त्याला एक डिमिरीट पाँइंटही देण्यात आला आहे. हा त्याची ही 24 महिन्यातील पहिली चूक होती.

तसेच आयसीसीने सांगितले आहे की इंग्लंडच्या दुसऱ्या डावावेळी ८१ व्या षटकात ऑली पोप धाव घेण्यासाठी धावत असताना बुमराह जाणून बुजून त्याच्या मध्ये आला होता. ज्यामुळे त्यांच्या चूकीच्या पद्धतीने एकमेकांना धडकले.

त्यामुळे बुमराहकडून आयसीसीच्या आचार संहितेतील कलम २.१२ चे उल्लंघन झाले आहे. खेळाडूंबरोबर किंवा सपोर्ट स्टाफबरोबर किंवा पंच, सामनाधिकारी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीशी (यात आंतरराष्ट्रीय सामना पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांचाही समावेश आहे.) अयोग्य पद्धतीने शारिरीक संपर्क येण्याबद्दल आहे.

बुमराहवर मैदानातील पंच पॉल रिफेल, ख्रिस गॅफने, तिसरे पंच मराईज इरॅसमस आणि चौथे पंच रोहन पंडीत यांनी आरोप लावले. दरम्यान बुमराहने आरोप मान्य केले असून सामनाधिकारी रिची रिचर्सडसन यांनी केलेली कारवाई देखील मान्य केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची अधिकृत सुनावणी होणार नसल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे.

पहिल्या सामन्यात बुमराहने पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या होत्या.

दरम्यान, इंग्लंडने पहिला सामना जिंकला असल्याने सध्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना २ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT