Jasprit Bumrah  Dainik Gomantak
क्रीडा

Jasprit Bumrah पुनरागमनासाठी सज्ज, WTC फायनलपूर्वी टीम इंडियाला मिळाली आनंदाची बातमी

Manish Jadhav

Jasprit Bumrah Latest Post: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना 7 जून ते 11 जून दरम्यान खेळवला जाणार आहे. या शानदार सामन्यासाठी टीम इंडियाचे काही खेळाडू इंग्लंडला पोहोचले आहेत.

दरम्यान, टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. बुमराह बऱ्याच दिवसांपासून दुखापतीशी झुंजत आहे.

जसप्रीत बुमराहने चाहत्यांना खूशखबर दिली आहे

जसप्रीत बुमराह गेल्या वर्षी मैदानावर दिसला होता. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी बुमराहने त्याच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट दिली आहे.

बुमराह (Jasprit Bumrah) ने शनिवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.

शूजचा फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'नमस्कार मित्रांनो, आपण पुन्हा भेटत आहोत.' जसप्रीत बुमराहच्या या पोस्टनंतर तो लवकरच मैदानात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

क्राइस्टचर्चमध्ये पाठीवर शस्त्रक्रिया झाली

न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्च शहरात जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) पाठीवर शस्त्रक्रिया झाली. क्राइस्टचर्चमधील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. रोवन स्काउटन यांनी ही शस्त्रक्रिया केली. बुमराहला तंदुरुस्त होण्यासाठी आणखी किमान सहा महिने लागतील.

त्याचवेळी, असे मानले जात आहे की, जसप्रीत बुमराह या वर्षाच्या अखेरीस आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परत येऊ शकतो.

टीम इंडियाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक

जसप्रीत बुमराहने टीम इंडियासाठी (Team India) आतापर्यंत 30 कसोटी सामने, 72 एकदिवसीय आणि 60 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 128, एकदिवसीय सामन्यात 121 आणि T20 मध्ये 70 विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह सध्या भारतातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक मानला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT