Jasprit Bumrah & Hardik Pandya Video: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची रोमांचक टी-20 मालिका खेळली जात आहे. रविवारी (25 जानेवारी) झालेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा 'यॉर्कर किंग' जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा थरार पाहायला मिळाला. बुमराहने आपल्या भेदक माऱ्याने न्यूझीलंडच्या फलंदाजांना अक्षरशः घाम फोडला. मात्र, या सामन्यात बुमराहच्या विकेटपेक्षाही जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे अष्टपैलू हार्दिक पांड्याने दिलेल्या एका 'हटके' प्रतिक्रियेची.
तिसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, जसप्रीत बुमराह स्पेलसाठी आला आणि सामन्याचे चित्रच पालटले. बुमराहने आपल्या अचूक टप्प्यावर आणि वेगावर नियंत्रण ठेवत कीवी फलंदाजांना हात खोलण्याची संधीच दिली नाही. त्याने आपल्या स्पेलमध्ये काईल जेमिसनला खतरनाक चेंडू टाकला.
डावातील महत्त्वाच्या षटकात बुमराहने काईल जेमिसनला क्लीन बोल्ड केले. जेमिसनला या चेंडूचा अंदाज येईपर्यंत चेंडूने त्याच्या बॅटचा बचाव भेदून थेट स्टंपचा वेध घेतला होता. स्टंप्स हवेत उडाल्यानंतर जेमिसन फक्त पाहतच राहिला. बुमराहच्या या 'क्लासिक' विकेटने स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला.
बुमराहने जेमिसनला बोल्ड करताच मैदानावर सर्व खेळाडू आनंद साजरा करत होते. मात्र, हार्दिक पांड्याची रिअॅक्शन सर्वांत वेगळी ठरली. पांड्याने कोणताही आरडाओरडा न करता, अगदी शांतपणे त्याच्या हटके शैलीत बुमराहकडे जल्लोष करण्यासाठी चालत आला. त्याचे हावभाव असे होते की, जणू तो म्हणतोय, "हे तर फक्त तूच करु शकतोस!" हार्दिकची ही 'कॅज्युअल' स्टाईल आणि चेहऱ्यावरील तो आत्मविश्वासपूर्ण मस्करीतला भाव कॅमेऱ्याने अचूक टिपला.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) वाऱ्यासारखा पसरला आहे. नेटकरी हार्दिकच्या या प्रतिक्रियेवर मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, "हार्दिकला माहिती होतं बुमराह हेच करणार आहे, म्हणून तो रिलॅक्स होता." तर दुसऱ्याने म्हटले, "हा हार्दिकचा खास स्वॅग आहे." या व्हिडिओमुळे बुमराहच्या गोलंदाजीसोबतच हार्दिकच्या 'कूल' वृत्तीचेही कौतुक होत आहे. या विजयामुळे भारताने मालिकेत आपली पकड अधिक मजबूत केली असून बुमराह-हार्दिकची ही जुगलबंदी चाहत्यांसाठी या सामन्याचा 'मोमेंट ऑफ द डे' ठरली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.