India vs Australia | Jarvo 69 AFP
क्रीडा

IND vs AUS: ...अन् तो परत आला! सामन्यादरम्यान पुन्हा मैदानात घुसला 'जार्वो 69'

Jarvo 69: दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा जार्वोने चेन्नईत सुरु असलेल्या वर्ल्डकपमधील सामन्यावेळी भारताची जर्सी घालून मैदानात घुसखोरी केल्याचे दिसले.

Pranali Kodre

Jarvo 69 again invaded the pitch at Chennai during India vs Australia match of ICC ODI Cricket World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरू झाली असून रविवारी (8 ऑक्टोबर) पाचवा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळवला जात आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर हा सामना होत आहे. दरम्यान, हा सामना सुरु असतानाच पुन्हा एकदा मैदानात जार्वोने घुसखोरी केल्याचे दिसले. त्याला बाहेर काढण्यासाठी विराट कोहलीलाही पुढे व्हावे लागले.

कोण आहे जार्वो 69?

जार्वो 69 या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीचे नाव डॅनिएल जार्विस आहे. तो सर्वात आधी 2021 मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यावेळी प्रकाशझोतात आला होता. तो त्यावेळी भारत आणि इंग्लंड संघात कसोटी मालिका सुरू असताना अनेकदा सुरक्षा तोडत मैदानात घुसला होता, अगदी लॉर्ड्स क्रिकेट मैदानातही तो अशाच प्रकारे अचानक मैदानात आला होता.

त्यावेळी तो भारतीय संघाची जर्सी घालून मैदानात आला होता. त्याने घातलेल्या जर्सीवर जार्वो 69 (Jarvo 69) असे लिहिलेले होते. त्यामुळे त्याला या नावाने ओळखले जाते. त्याने मैदानात घुसल्यानंतर अनेकदा सुरक्षारक्षकांनी बाहेर काढले आहे.

दरम्यान ओव्हल कसोटीदरम्यान देखील जॉनी बेअरस्टो फलंदाजी करत असताना जार्वो अचानक मैदानात जोरात पळत आला होता आणि त्याने गोलंदाजी करण्याची ऍक्शन केली होती. त्यावेळी तो बेअरस्टोला धडकलाही होता.

त्यानंतर मात्र, त्याला इंग्लंडमधील पोलिसांनी अटक केली होती. तसेच त्याला लॉर्ड्स आणि हेडिंग्ले मैदानावर येण्यापासून बंदीही घलण्यात आली आहे.

विशेष म्हणडे फक्त क्रिकेटच नाही, तर तो विविध खेळांच्या सामन्यादरम्यानही असाच अनेकदा मैदानात घुसला आहे.

दोन वर्षांनी पुन्हा दिसला जार्वो

या घटनांनंतर आता पुन्हा जार्वो चर्चेत आला कारण तो चेन्नईत सुरु असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्डकप 2023 मधील सामन्यावेळीही अचानक मैदानात घुसला.

यावेळीही तो त्याचे नाव लिहिलेली भारताची जर्सी घालून सुरक्षा रक्षकांना हुलकावणी देत मैदानात घुसला होता. अखेर त्याला सुरक्षारक्षकांनी बाहेर काढले. यावेळी विराट कोहलीलाही मध्ये पडून त्याला बाहेर करावे लागले.

दरम्यान, त्याने अशाप्रकारे सातत्याने सुरक्षा तोडत मैदानात घुसण्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच त्याच्याविरुद्ध कारवाईचीही मागणी काहीजणांनी सोशल मीडियावरून केली आहे. तर काही युजर्सने त्याचे फोटो शेअर करत या घटनेही मजा घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT