Jamshedpur FC

 

Dainik Gomantak 

क्रीडा

Indian Super League: जमशेदपूरच्या स्टुअर्टची धडाक्यात 'हॅटट्रिक' !

इंडियन सुपर लीग ( ISL) फुटबॉल स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक त्यानेच नोंदविली, तसेच आठव्या मोसमातील शंभरावा गोलही केला.

दैनिक गोमन्तक

पणजी : स्कॉटलंडचा (Scotland) स्ट्रायकर ग्रेग स्टुअर्ट याने मंगळवारी वास्को येथील टिळक मैदानावर जबरदस्त खेळ केला. इंडियन सुपर लीग ( ISL) फुटबॉल स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक त्यानेच नोंदविली, तसेच आठव्या मोसमातील शंभरावा गोलही केला. त्याच्या चतुरस्त्र खेळामुळे जमशेदपूर एफसीने (Jamshedpur FC) धडाका राखत ओडिशा एफसीचा (Odisha FC) 4-0 फरकाने धुव्वा उडविला.

जमशेदपूरने सामन्यातील पहिल्या 35 मिनिटांच्या खेळात चारही गोल करून यापूर्वी तीन सामने जिंकलेल्या ओडिशाच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. ग्रेग स्टुअर्टच्या कॉर्नर फटक्यावर पीटर हार्टली याने भेदक हेडिंग साधल्यामुळे जमशेदपूरला तिसऱ्याच मिनिटास आघाडी मिळाली. नंतर चौथ्या मिनिटास 31 वर्षीय स्टुअर्टने सामन्यातील वैयक्तिक पहिला गोल केला

ग्रेग स्टुअर्टने 21व्या मिनिटास गोलक्षेत्राबाहेरून मारलेल्या थेट ताकदवान फ्रीकिक फटक्यावर ओडिशाचा गोलरक्षक कमलजित सिंग याला संधीच दिली नाही. हा प्रेक्षणीय गोल यंदाच्या आयएसएलमधील हा शंभरावा गोल ठरला. नंतर 35व्या मिनिटास स्टुअर्टने यावेळच्या स्पर्धेतील पहिल्या हॅटट्रिकचा मान मिळविला.

जमशेदपूर दुसऱ्या स्थानी

जमशेदपूरने मंगळवारी सहा लढतीतील तिसरा सामना जिंकला. त्यांचे आता 11 गुण झाले असून तिसऱ्या क्रमांकापर्यंत प्रगती साधता आली. अव्वल स्थानावरील मुंबई सिटीपेक्षा त्यांचा फक्त एक गुण कमी आहे. ओडिशा एफसीचा हा स्पर्धेतील दुसरा पराभव ठरला. त्यामुळे पाच लढतीनंतर त्यांचे नऊ गुण कायम राहिले व त्यांना चौथ्या स्थानी घसरावे लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT