Ranji Trophy Dainik Gomantak
क्रीडा

Ranji Trophy: जम्मू-काश्मीर संघाचा ऐतिहासिक विजय, बंगालवर मात करून पहिल्यांदाच स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

Ranji Trophy 2026: जम्मू-काश्मीरने बुधवारी देशांतर्गत क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले.

गोमंतक ऑनलाईन टीम

श्रीनगर: जम्मू-काश्मीरने बुधवारी देशांतर्गत क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत कल्याणी येथे बंगाल क्रिकेट संघावर दणदणीत विजय मिळवून त्यांनी प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला. आता अंतिम फेरीत त्यांची गाठ कर्नाटकशी पडणार आहे.

१२६ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना जम्मू-काश्मीरने ३४.४ षटकांत चार गडी गमावून १२६ अशी मजल मारली. निर्णायक धावा षटकार ठोकून पूर्ण करण्यात आल्या आणि त्यानंतर एकच जल्लोष सुरू झाला.

विजयाची पायाभरणी सांघिक कामगिरीमुळे शक्य झाली. वेगवान गोलंदाज अकिब नबी दार याने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर निर्णायक भूमिका बजावली. पहिल्या डावात खालच्या फळीतील महत्त्वपूर्ण भागीदारीदरम्यान त्याने ४२ धावा केल्या.

त्यानंतर बंगालच्या दुसऱ्या डावात ३६ धावांच्या बदल्यात चार बळी घेऊन सामन्यात एकूण नऊ बळी घेतले. यापूर्वी बंगालने पहिल्या डावात ३२८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल जम्मू-काश्मीरने ३०२ धावा केल्या होत्या.

सर्वांत मोठा टप्पा

जम्मू-काश्मीरची ही कामगिरी रणजी करंडकातील जम्मू-काश्मीरच्या प्रवासातील सर्वांत मोठा टप्पा आहे. पूर्वी पात्रतेसाठी झगडणाऱ्या संघाने देदीप्यमान यश मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. संघासाठी आणि जम्मू-काश्मीर क्रिकेटसाठी हा निर्णायक क्षण ठरला आहे.

नायब राज्यपालांकडून कौतुक

नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी बुधवारी जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाचे त्यांच्या पहिल्या रणजी करंडकात अंतिम फेरीत प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन केले. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सिन्हा म्हणाले, ‘‘रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीतील शानदार विजयाबद्दल जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन! तुम्ही जम्मू-काश्मीरच्या क्रीडा इतिहासात एक नवे सुवर्णपान लिहिले आहे. संपूर्ण केंद्रशासित प्रदेशाला तुमच्या या विलक्षण कामगिरीचा अभिमान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT