James Anderson
James Anderson Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: जेम्स अँडरसन कसोटी मालिकेनंतर घेणार निवृत्ती?

दैनिक गोमन्तक

इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टीव्ह हार्मिसनने (Steve Harmison) मोठी शक्यता वर्तविली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) लवकरच निवृत्त होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली आहे. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेनंतर तो निवृत्तीची घोषणा करु शकतो. जेम्स अँडरसन 39 वर्षांचा आहे. तो कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज असून त्याने 600 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत तो मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न नंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. घरेलू कसोटीत 300 हून अधिक बळी घेणारा अँडरसन दुसरा इंग्लिश वेगवान गोलंदाज आहे. त्याच्याशिवाय, स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) अशी कामगिरी करुन दाखवली होती.

भारताविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत जेम्स अँडरसनने तीन कसोटीत 13 विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान, त्याची सरासरी 16.25 आहे आणि स्ट्राइक रेट 47.7 आहे. या मालिकेत त्याने एका डावात पाच बळी घेण्याचे चमत्कारही केला आहे. या वर्षी ते उत्तम फॉर्ममध्येही आहे. त्याने 19.79 च्या सरासरीने 30 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने एका डावात दोन वेळा पाच-पाच विकेट्स घेतल्या. त्याच्याविषयी स्टीव्ह हर्मिसनने टॉकस्पोर्ट क्रिकेट पॉडकास्टला सांगितले, 'मला थोडे विचित्र वाटते. का माहित नाही पण मला वाटते की, ओल्ड ट्रॅफर्ड नंतर जिमी अँडरसन निवृत्त होतील.

अँडरसनने 2015 मध्ये एकदिवसीय-टी -20 सोडले

एशेज मालिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान खेळली जाणार आहे. पण ऑस्ट्रेलियातील कोरोना वाढत्या रुग्णसंख्येमुळे मालिकेवर कोरोनाचं सावट आहे. अशा परिस्थितीत असे मानले जाते की, जेम्स अँडरसन लवकरच निवृत्तीची घोषणा करु शकतो. त्याने कसोटीपासून लक्ष विचलित होऊ नये यासाठी 2015 मध्ये वनडे आणि टी -20 क्रिकेट सोडले. तो नुकताच द हंड्रेड टूर्नामेंटमध्ये खेळणार होता पण नंतर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये न खेळण्याच्या भीतीमुळे हा निर्णयालाही तिलांजली दिली होती. अलीकडच्या काळात तो दुखापतींला बळीही पडला होता. यामुळे अँडरसन अतिशय काळजीपूर्वक खेळतो आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway Fine Collection: फुकट्यांना कोकण रेल्वेचा दणका, एप्रिलमध्ये 2.70 कोटी दंड वसूल

Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

Defamatory Post Lairai Devi: अन्यथा अस्नोडा जंक्शन रोखणार! भाविकांची म्हापसा पोलिस स्थानकावर धडक

Madgaon Station News: कोकण रेल्वेची मडगाव येथे रेंट अ बाईक सुविधा; विजय सरदेसाईंचा कडाडून विरोध, आंदोलनाचा इशारा

आम्ही गप्प बसू शकत नाही...अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास कोर्टाची परवानगी

SCROLL FOR NEXT