James Anderson Dainik Gomantak
क्रीडा

James Anderson ने केला नवा विश्वविक्रम, क्रिकेटचा देवही 'हा' पराक्रम करु शकला नाही

James Anderson: अँडरसनने गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात संघासाठी मैदानात उतरुन अतुलनीय कामगिरी केली.

दैनिक गोमन्तक

James Anderson: इंग्लंडचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात संघासाठी मैदानात उतरुन अतुलनीय कामगिरी केली. आपल्या संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम करणाऱ्या अँडरसनने इंग्लंडमधील आपल्या 100 व्या कसोटीत भाग घेतला होता. अशा प्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो एकाच देशातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

दरम्यान, महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर देशात (भारत) सर्वाधिक कसोटी खेळण्याचा विक्रम आहे. त्याने भारतात एकूण 94 कसोटी सामने खेळले. अँडरसनने याआधीच हा विक्रम मोडीत काढला असून आपल्याच देशात 100 कसोटी सामने खेळणारा तो जगातील पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला आहे. सचिन आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर रिकी पाँटिंग (Ricky Ponting) (ऑस्ट्रेलियामध्ये 92 कसोटी) आणि अँडरसनचा सहकारी स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंडमध्ये 91 कसोटी) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, गेल्या महिन्यात 40 वर्षांचा झालेला अँडरसन 200 कसोटी सामन्यांचा टप्पा गाठू शकेल का हे पाहायचे आहे. कारण हे कामगिरी फक्त सचिनच करु शकला आहे. अँडरसनने आतापर्यंत 174 कसोटी सामने खेळले आहेत. क्रिकेटच्या या लांबलचक फॉरमॅटमध्ये त्याने आतापर्यंत 658 विकेट्स घेतल्या आहेत. तर सध्या तो श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) (800) आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (708) यांच्या पाठीमागे आहे. सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे.

तसेच, मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याबाबत दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. लॉर्ड्सवरील पहिल्या सामन्यात एक डाव आणि 12 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर यजमान इंग्लंड मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. बेन स्टोक्स आणि ब्रेंडन मॅक्युलम या कर्णधार-प्रशिक्षक जोडीने पदभार स्वीकारल्यानंतर इंग्लंडचा हा पहिलाच पराभव होता. इंग्लंडने यापूर्वी न्यूझीलंड आणि भारताचा पराभव केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT