9000 runs and 600 wickets in domestic Cricket
भारतात सध्या रणजी ट्रॉफीचा हंगाम सुरू आहे. या स्पर्धेत केरळचा पहिला सामना उत्तर प्रदेश संघाशी झाला. अलप्पुझाला झालेला हा सामना अनिर्णित राहिला. पण या सामन्यात केरळकडून खेळणाऱ्या जलज सक्सेनाने खास विक्रम केला आहे.
सक्सेनाने या सामन्यात दोन डावात मिळून ३ विकेट्स घेतल्या. त्यामुळे आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी२० प्रकार मिळून त्याच्या ६०२ विकेट्स झाल्या आहेत.
त्यामुळे तो देशांतर्गत क्रिकेटच्या इतिहासात ९००० धावांपेक्षा अधिक धावा आणि ६०० पेक्षा अधिक विकेट्स घेणारा तिसराच भारतीय ठरला आहे. यापूर्वी मदन लाल आणि विनू मंकड यांनी असा कारनामा केला आहे.
37 वर्षीय जलजने आत्तापर्यंत तिन्ही प्रकारात देशांतर्गत क्रिकेटमध्ये 308 सामने खेळले आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 134 सामन्यांमध्ये 6574 धावा केल्या आहेत आणि 413 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याचबरोबर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 104 सामने खेळताना 2035 धावा धावा केल्या असून 117 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 70 टी20 सामने खेळले असून 661 धावा केल्या आहेत आणि 72 विकेट्स घेतल्या आहेत.
साल 2005 मध्ये जलजने मध्यप्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो दिल्लीकडून खेळला. यानंतर 2016 साली तो केरळ संघात सामील झाला. तो 2022-23 रणजी ट्रॉफी हंगामात सर्वाधिक 50 विकेट्स घेतल्या होत्या.
दरम्यान, सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी एकदाही मिळाली नाही. त्याला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या संघांनी घेतले आहे. पण त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली.
त्याने 2021 हंगामात पंजाब किंग्सकडून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना खेळला. या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण गोलंदाजी करताना त्याने 3 सामन्यात 27 धावा दिल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.