Italy second time Euro Cup champions; England lost on penalties in the final Twitter @@azzurri
क्रीडा

EURO Cup Final: इटलीने मिळवलं जेतेपद तर इंग्लंडचं स्वप्न पुन्हा भंगलं

पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीने इंग्लंडचा 3-2 असा पराभव केला. इंग्लंडला सलग 3 पेनल्टीवर गोल करता आला नाही तर इटलीने 2 पेनल्टी चुकवल्या पण ३ मध्ये स्कोअर केले.(EURO Cup Final)

दैनिक गोमन्तक

मागील एक महिन्यापासून सुरु असलेल्या युरो चषकचा (Euro Cup 2020) थरार अखेर काल संपला आणि इटलीने (Italy) अखेर युरो चषक 2020(Euro Cup Final) वर आपले नाव कोरले. युरो चषक 2020 च्या अंतिम सामन्यात इटलीने इंग्लंडचा(England) पराभव केला. अंतिम सामना खूप रोमांचक होता, परंतु शेवटी इटलीने विजय मिळविला. दोन्ही संघांनी चांगली सुरुवात केली होती पण शेवटी पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीने विजय मिळवला. १२० मिनिटे चाललेला हा थरारक सामना प्रथम १-१ने बरोबरीत सुटला आणि त्यानंतर सामन्याचा निकाल मिळवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट झाला, त्यात इटलीने विजय मिळवला.

पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीने इंग्लंडचा 3-2 असा पराभव केला. इंग्लंडला सलग 3 पेनल्टीवर गोल करता आला नाही तर इटलीने 2 पेनल्टी चुकवल्या पण ३ मध्ये स्कोअर केले. आणि या थरारकानंतर अखेर इटली 1968 नंतर पुन्हा युरोपियन विजेता बनला आहे.

लंडनच्या ऐतिहासिक वेम्बली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या शानदार सामन्याच्या सुरूवातीला लूक शॉने एक शानदार गोल करून इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफच्या शेवटी इंग्लंडने इटलीवर 1-0 अशी आघाडी कायम राखली. मात्र, दुसऱ्या हाफच्या सुरूवातीला इटलीच्या लिओनार्डो बोनुचीने सामन्याच्या 67 व्या मिनिटाला गोल करत सामना 1-1 अशी बरोबरीत रोखला. अशाप्रकारे, 120 मिनिटे चाललेला हा रोमांचक सामना 1-1ने बरोबरीत सुटला. त्यानंतर इटलीने पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडचा 3-2 असा पराभव केला आहे.

गेल्या 55 वर्षांपासून इंग्लंडचा संघ कोणतीही मोठी फुटबॉल स्पर्धा जिंकू शकला नाही. अशा परिस्थितीत आज ती विजेतेपदाच स्वप्न घेऊन मैदानात उतरली होती, परंतु पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीने चमकदार कामगिरी करून विजय मिळविला आणि इंग्लंडचे जेतेपद जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT