Akhil Sheoran and Mehuli Ghosh Dainik Gomantak
क्रीडा

ISSF World Championships: भारतीय नेमबाजांचा अचूक लक्ष्यभेद! अखिल, मेहुलीने पदकांसह मिळवलं पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट

ISSF World Championships: जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी शानदार कामगिरी नोंदवली असून अखिल आणि मेहुली यांनी पॅरिस ऑलिम्पिकचा कोटाही मिळवला.

Pranali Kodre

ISSF World Championships: Mehuli Ghosh and Akhil Sheoran booked Paris Olympic 2024 quota:

अझरबैजानमधील बाकू येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी शानदार कामगिरी नोंदवली आहे. या स्पर्धेत खेळताना भारताच्या अखिल शेवरान आणि मेहुली घोष यांनी कांस्य पदकांची कमाई करण्याबरोबरच पुढीलवर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटाही मिळवला आहे.

शनिवारी 22 वर्षीय मेहुलीने महिला 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत 229.8 गुणांसह तिसरे स्थान पटकावले. याबरोबरच तिने पॅरिस ऑलिम्पिकचा कोटाही मिळवला.

दरम्यान, या प्रकारात सुवर्ण आणि रौप्य पदक चीनच्याच अनुक्रमे जिआयू हान आणि झिलीन वँग यांनी जिंकले.

तसेच अखिलने 50 मीटर रायफल 3-पोझिशन प्रकारात कांस्य पदक जिंकले. त्याने रौप्य पदक केवळ 0.1 पाँइंटने हुकले. पण असे असले, तरी त्यानेही या कामगिरीसह पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळवला.

या प्रकारात ऑस्ट्रेलियाच्या अलेक्झँडर शमरिलने सुवर्णपदक आणि चेक प्रजासत्ताकच्या पीटर एनने रौप्यपदक जिंकले.

दरम्यान, अखिल आणि मेहुली यांनी आपपल्या प्रकारात सांघिक पदकेही जिंकली. अखिलने ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर आणि नीरजकुमार यांच्यासह पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3-पोझिशन प्रकारात भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकून दिले.

याशिवाय रिदम सांगवान, इशा सिंग आणि मनु भाकर यांनी 25 मीटर पिस्तुल सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले.

तसेच मेहुलीने शनिवारी तिलोत्तमा सेन आणि रमिता यांच्यासह भारतीय संघाकडून महिलांच्या एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत नेमबाजीमध्ये पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताला 5 कोटो मिळाले आहेत. अखिल आणि मेहुली यांच्यापूर्वी रुद्रांक्ष पाटील, स्वप्नील कुसळे आणि भाउनीश मेंडीरट्टा यांना ऑलिम्पिक कोटा मिळाला आहे.

बाकूमधील जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने तीन सुवर्णपदके आणि तीन कांस्य पदके मिळवली आहेत.

तसेच पदकतालिकेत अव्वल क्रमांकावर चीन असून त्यांच्या नेमबाजांनी मिळून सात सुवर्णपदके, तीन रौप्य पदके आणि तीन कांस्य पदके जिंकली आहेत. त्याचबरोबर दोन सुवर्णपदके आणि एका रौप्यपदकासह तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT