Isle of Man vs Spain Dainik Gomantak
क्रीडा

T20 Cricket Record: ऐकावं ते नवलंच! फक्त दोन चेंडूतच जिंकली टी20 मॅच, 'या' संघाची कमाल

टी20 क्रिकेटमध्ये एक अनोखा सामना रविवारी पाहायला मिळाला, ज्यात एका संघाने केवळ दोन चेंडूत सामना जिंकला.

Pranali Kodre

T20 Cricket: क्रिकेटमध्ये कधी सामना पलटू शकतो, हे सांगता येत नाही. त्यामुळे क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ असेही म्हटले जाते. याचा प्रत्येय नुकताच रविवारी मंगा क्लब बॉटम ग्राउंडवर झालेल्या आयल ऑफ मॅन विरुद्ध स्पेन यांच्यात झालेल्या सामन्यात आला.

या सामन्यात आयल ऑफ मॅनने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्यांनी टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर सर्वबाद होण्याचा विक्रम नावावर केला आहे. तसेच हा सामना स्पेनने फक्त 2 चेंडूत जिंकला आहे.

या सामन्यात स्पेनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला स्पेनच्या गोलंदाजांनी योग्य ठरवत आयल ऑफ मॅनला 8.4 षटकात केवळ 10 धावांत बाद केले.

आयल ऑफ मॅनकडून जोसेफ बुरोसने सर्वाधिक 4 धावा केल्या. या संघाचे तब्बल 6 फलंदाज शुन्यावर बाद झाले, तर अन्य तीन खेळाडूंनी प्रत्येकी 2 धावा केल्या. स्पेनकडून मोहम्मद कामरानने 4 धावा देत 4 विकेट्स आणि अतिफ मेहमूदने 6 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर लॉर्न बर्न्सने 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 11 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या स्पेनने केवळ 2 अधिकृत चेंडूतच सामना जिंकला. स्पेनकडून अवेस अहमद आणि मोहम्मद इहसन सलामीला उतरले होते. तसेच जोसेफ बुरोसने पहिले षटक टाकले. पण त्याच्या पहिल्या दोन अधिकृत चेंडूतच अवेसने दोन षटकार ठोकत सामना जिंकवला. दरम्यान, बुरोसने हे दोन चेंडू टाकताना एक नो-बॉलही टाकला होता.

दरम्यान, टी20 क्रिकेटमध्ये आयल ऑफ मॅनच्या आधी सिडनी थंडर्सच्या नावावर सर्वात कमी धावात बाद होण्याचा विक्रम होता. हा संघ 2022-23 बिग बॅश हंगामात ऍडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध 15 धावांवर सर्वबाद झाला होता. तसेच तुर्कीचा संघ 2019 मध्ये चेक रिपब्लिकविरुद्ध 21 धावांवर सर्वबाद झाला होता. 2021 साली लेसोथो संघ युगांडाविरुद्ध 26 धावांवर सर्वबाद झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT