NorthEast United FC Vs FC Goa Dainik Gomantak
क्रीडा

ISL Football: बरोबरीमुळे एफसी गोवाने दोन गुण गमावले; नॉर्थईस्ट युनायटेडची पेनल्टी गोलमुळे बरोबरी

एफसी गोवा सहाव्या स्थानी

Kishor Petkar

ISL Football: नॉर्थईस्ट युनायटेडचा कोलंबियन खेळाडू विल्मार जॉर्डन गिल याने दोन वेळा पेनल्टी फटक्यांवर अचूक नेम साधला, त्यामुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा संघाला दोन गुणांचे नुकसान सहन करावे लागले. गुवाहाटी येथे रविवारी झालेला सामना 2-2 असा गोलबरोबरीत राहिला.

एदू बेदिया याच्या गोलमुळे एफसी गोवाने 31व्या मिनिटास आघाडी मिळविली. मात्र 45+3व्या मिनिटास जॉर्डन याने पेनल्टी फटक्याचा नेम चुकविला नाही. त्यामुळे स्थानिक संघाने 1-1 अशी गोलबरोबरी साधली. उत्तरार्धात एफसी गोवा संघाला पेनल्टी फटका मिळाला. यावेळी स्पॅनिश खेळाडू इकेर ग्वोर्रोचेना याने गोव्यातील संघाला पुन्हा आघाडीवर नेले. सामन्यातील वीस मिनिटे शिल्लक असताना नॉर्थईस्ट युनायटेडला सामन्यातील दुसरा पेनल्टी फटका मिळाला. 71व्या मिनिटासही जॉर्डन याचा नेम पुन्हा अचूक ठरला. इंज्युरी टाईमच्या अखेरच्या मिनिटास ब्रायसन फर्नांडिसने चेंडूला गोलनेटची दिशा दाखविली होती, पण तो प्रयत्न ऑफसाईड ठरल्यामुळे एफसी गोवास एका गुणावर समाधान मानावे लागले.

एफसी गोवा सहाव्या स्थानी

एफसी गोवाची ही स्पर्धेतील दुसरी बरोबरी ठरली. त्यामुळे 14 लढतीनंतर 20 गुणांसह ते सहाव्या क्रमांकावर कायम राहिले. पाचव्या क्रमांकावरील ओडिशा एफसीपेक्षा त्यांचे दोन गुण कमी आहेत. एफसी गोवाचा पुढील सामना येत्या रविवारी (ता. 22) फातोर्डा येथे केरळा ब्लास्टर्सविरुद्ध होईल. स्पर्धेतील चार लढतीत त्यांना फक्त दोनच गुण मिळविता आले आहेत. नॉर्थईस्ट युनायटेडची ही पहिलीच बरोबरी ठरली. 14 लढतीनंतर त्यांचे चार गुण झाले असून तळाचे अकरावे स्थान कायम आहे.

शंभराव्या लढतीत एदूचा गोल

आयएसएल स्पर्धेत शंभरावा सामना खेळताना एफसी गोवाच्या एदू बेदिया याने गोल केला. तो यंदा सलग सहावा मोसम खेळत आहे. ब्रँडन फर्नांडिसच्या पासवर एदू याने डाव्या पायाच्या व्हॉली फटक्यावर नॉर्थईस्टचा गोलरक्षक मिर्षाद मिचू याला चकविले. या ३३ स्पॅनिश मध्यरक्षकाने आता यंदा स्पर्धेत तीन, तर एकंदरीत 13 आयएसएल गोल केले आहेत.

पेनल्टी गोलचे वर्चस्व

विश्रांतीपूर्वी नॉर्थईस्टच्या एमिल बेनी याच्या कॉर्नर फटक्यावर ॲलेक्स साजी याचा फटका रोखण्याच्या प्रयत्नात चेंडू एफसी गोवाच्या ब्रँडन फर्नांडिसच्या हाती लागला. त्यामुळे रेफरीने पेनल्टी खूण केली व जॉर्डन याने यजमान संघाला बरोबरी साधून दिली. तासाभराच्या खेळानंतर एफसी गोवाच्या नोआ सदावी याने नॉर्थईस्टच्या गोलरिंगणात जोरदार मुसंडी मारली असता गोलरक्षक मिर्षाद याने त्याला पाडले. यावेळी पेनल्टी फटक्यावर ग्वोर्रोचेना याने मोसमातील वैयक्तिक सहावा गोल नोंदविला. त्यानंतर नॉर्थईस्टच्या प्रग्यान गोगोई याने एफसी गोवाच्या महंमद फारेस अर्नौट याला गुंगारा देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला पाडण्यात आले. यावेळी रेफरीने सामन्यात दुसऱ्यांदा नॉर्थईस्टला पेनल्टी फटका दिला. यावेळसही जॉर्डन याने एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज मोईरांगथेम याला सहजपणे चकविले.

दृष्टिक्षेपात...

- एफसी गोवा व नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यातील आयएसएल स्पर्धेत 9 बरोबरी

- एकूण 18 लढती, त्यापैकी एफसी गोवा 6, तर नॉर्थईस्ट 3 सामन्यांत विजयी

- एफसी गोवाचे आता स्पर्धेत 23, तर नॉर्थईस्ट युनायटेडचे 13 गोल

- एफसी गोवा सलग 4 लढती विजयाविना, 2 बरोबरी व 2 पराभव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकल्याच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT