FC Goa in Indian Super League Football:  Dainik Gomantak
क्रीडा

ISL Football: रॉलिनच्या गोलमुळे एफसी गोवाची सरशी; केरळा ब्लास्टर्सला एका गोलने नमवून अव्वलस्थानी विराजमान

FC Goa in Indian Super League Football: एफसी गोवाचा पुढील सामना मुंबई सिटी एफसीविरूद्ध

किशोर पेटकर

FC Goa in Indian Super League Football: सामन्याच्या पूर्वार्धातील इंज्युरी टाईममध्ये रॉलिन बोर्जिस याने केलेल्या गोलच्या बळावर एफसी गोवा संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अग्रस्थान मिळविले.

केरळा ब्लास्टर्सला 1-0 फरकाने नमवून मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने अपराजित घोडदौडही कायम राखली. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रविवारी झाला.

सामन्यात निर्णायक ठरलेला गोल रॉलिन याने 45+1व्या मिनिटास व्हिक्टर रॉड्रिगेझ याच्या असिस्टवर नोंदविला. एकंदरीत एफसी गोवाचा हा सात सामन्यांतील सहावा विजय ठरला. अन्य एका बरोबरीसह त्यांचे आता 19 गुण झाले आहेत.

पहिला क्रमांक मिळविताना त्यांनी केरळा ब्लास्टर्सवर दोन गुणांची आघाडी घेतली. स्पर्धेतील दुसऱ्या पराभवामुळे केरळा ब्लास्टर्सचे नऊ लढतीनंतर 17 गुण कायम राहिले.

घरच्या मैदानावर विजयी चौकार

आयएसएल स्पर्धेच्या दहाव्या मोसमात एफसी गोवा संघाने रविवारी फातोर्डा येथे सलग चौथा विजय नोंदविला. भक्कम बचावाचे प्रदर्शन कायम राखताना पाचव्या सामन्यात क्लीन शीट राखली.

केरळा ब्लास्टर्सने एफसी गोवाने आघाडी घेतल्यानंतर बरोबरीसाठी प्रयत्न केले, परंतु संदेश झिंगनचा समावेश असलेल्या बचावफळीने प्रतिस्पर्ध्यांना विशेष मोकळीक दिली नाही. गोलरक्षक अर्शदीप सिंग याने दक्षता राखली.

एफसी गोवाचा पुढील सामना 12 डिसेंबर रोजी मुंबई सिटी एफसीविरुद्ध फातोर्डा येथेच खेळला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumah Angry: "मी तुम्हाला बोलवलं नाहीय..." मैदानात साधा दिसणारा 'जस्सी' पापाराझींवर का चिडला? पाहा Viral Video

Rain In Goa: दिवाळीच्या पहिल्या आंघोळीपर्यंत पडणार पाऊस; गोव्यात पाच दिवस यलो अलर्ट

Goa Live Updates: आगरवाड्यात 25 रोजी आकाशकंदील स्पर्धा

IND vs AUS: रोहित, विराट कोहलीचा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा? पॅट कमिंसने व्यक्त केला अंदाज

अग्रलेख: कष्टकरी, शेतकरी आणि बहुजन समाजाचा एक हक्काचा 'कैवारी' हरपला

SCROLL FOR NEXT