FC Goa vs Mumbai City FC 
क्रीडा

ISL Football: एफसी गोवास मुंबई सिटीने रोखले, सामन्यात गोलशून्य बरोबरी

FC Goa vs Mumbai City FC: एफसी गोवा विरुद्ध मुंबई सिटी सामन्यात गोलशून्य बरोबरी

किशोर पेटकर

ISL 2023-24 Football, FC Goa vs Mumbai City FC:

इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेतील एफसी गोवा व मुंबई सिटी या संघांची अपराजित मालिका मंगळवारीही (12 डिसेंबर) कायम राहिली.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवरील गोलशून्य बरोबरीमुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले.

गोलशून्य बरोबरीमुळे एफसी गोवा संघ 20 गुणांसह गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर कायम राहिला. त्यांनी दुसऱ्या क्रमांकावरील केरळा ब्लास्टर्सवर तीन गुणांची आघाडी घेतली आहे. आठ लढतीत सहा विजय व दोन बरोबरी अशी त्यांची कामगिरी आहे.

घरच्या मैदानावर सलग चार सामने जिंकल्यानंतर एफसी गोवा संघाला मोसमात प्रथमच बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले.

मुंबई सिटीची ही स्पर्धेतील तिसरी बरोबरी ठरली. अन्य चार सामने जिंकलेल्या या संघाचे सात लढतीतून 15 गुण झाले असून ते चौथ्या क्रमांकावर कायम आहेत.

स्पर्धेतील एफसी गोवा पुढील सामना अवे मैदानावर खेळला जाईल. मोहन बागान सुपर जायंट्सविरुद्धचा त्यांचा सामना 23 डिसेंबर रोजी कोलकाता येथे होईल. मुंबई सिटीचा सामना 16 डिसेंबर रोजी मुंबई येथे ईस्ट बंगालविरुद्ध खेळला जाईल.

दृष्टिक्षेपात...

  • - यावेळच्या स्पर्धेत एफसी गोवाची 6 सामन्यात क्लीन शीट

  • - 23 लढतीत एफसी गोवा व मुंबई सिटी यांच्यात 6 बरोबरी

  • - एफसी गोवाची बंगळूर एफसीनंतर यंदा दुसऱ्यांदा 0-0 बरोबरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT